रोहित पवार जागते रहो...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

रोहित पवार जागते रहो...!

 रोहित पवार जागते रहो...!

अजित पवारांचा खून दडपण्यासाठी अशोक खरात प्रकरणाचा टोटका वापरला जातोय का ?
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सध्या मराठी माध्यमात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत फक्त आणि फक्त भोंदू अशोक खरात चालवला जातो आहे. चोवीस तास अशोक खरात एके अशोक खरात दाखवला जातो आहे. भारत देशात तथाकथित साधूंच्या संस्कृतीची हागणदारी अशीच आहे. ब्राम्हण्यवादी सनातन संस्कृती म्हणजे फुलं टाकून झाकलेली विष्ठा आहे. धर्माच्या नावावर चालू असलेले शोषण तेवढेच सनातन आणि पुरातन आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी याला शाैचकुप म्हंटलय. असला प्रकार अशोक खरातने इतिहासात पहिल्यादाच केलाय असं नव्हे. देवांचा राजा म्हणून ज्याची ओळख सांगितली जाते त्या इंद्राने अहिल्येचा पती गाैतम ऋषीचे सोंग घेवून अहिल्येवर बलात्कार केल्याचा दाखला ब्रम्हपुराण, पद्मपुराण व रामायण-महाभारतातही आहे. पुराणात असे कैक बलात्कार नमूद आहेत. इंद्रापासून आसाराम, रामरहिम ते अशोक खरात पर्यंत हा सिलसिला चालूच आहे. इथं धर्माच्या नावाने व्यवस्थाच अशी तयार केली आहे की ज्यांचे शोषण केले जाते त्यांनाही हे शोषण वाटत नाही. बाकी जो सापडतो तो भोंदू असतो आणि इतर सगळे साधू असाच नियम आहे. यात काही सन्माननीय संतांचे अपवाद वगळता साधूच्या वेशातले अनेकजण असेच असतात. अशोक खरात जेवढा माध्यमातून चालवला जातोय तेवढाच तो पुण्यातील स्वत:ला महादेवाचा अवतार म्हणून घोषित करणारा "वैद्य बुवा" चालवला जात नाही याचे कारण काय ? अशोक खरातनेही "गु" खाल्ला आणि 'वैद्य' बुवानेही "गु" च खाल्ला पण माध्यमं चघळतात फक्त खरातचा, वैद्य बुवाचा बिलकुल नाही. हा जात गोतावळ्याचा दुजाभाव यात आहेच पण त्या ही पलिकडे जाऊन अजित पवार हत्या प्रकरण दडपण्यासाठी, त्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, लोकांना त्याचा विसर पाडण्यासाठी अशोक खरातचे कारनामे चोवीस तास माध्यमं दाखवतात की काय ? असा संशय येतो आहे. अशोक खरात प्रकरण हे अजित पवारांची हत्या दुर्लक्षित व्हावी. त्या बाबत लोकांच्यात चालणारी चर्चा थांबावी यासाठी  खरात प्रकरणाला 'टोटका' म्हणून  वापरले जातेय की काय ? असे वाटते आहे. त्यामुळे अजित पवार प्रकरण उचलून धरणा-या आमदार रोहित पवार यांनी सावध रहायला हवं. त्यांनी ठामपणे या प्रकरणाच्या तळाशी जायला हवं. जोपर्यंत नेमकं सत्य हाताला लागत नाही तोपर्यंत  लढत रहायला हवं. म्हणूनच आम्हाला रोहित पवार यांना सावध करण्यासाठी, रोहित पवार जागते रहो ! असं आवाहन करावं वाटतं आहे.
   
     महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद वाटतो. राज्यातील तमाम जनतेच्या मनात त्याबाबत संशय येत राहतो पण सरकार त्यावर पारदर्शीपणे काम करत नाही. त्याबाबत गुन्हा दाखल करायला गेल्यावर गुन्हा दाखल करून घेत नाही. टाळाटाळ केली जाते. शेजारच्या कर्नाटकात सदर घटणेबाबत गुन्हा दाखल झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमत्री विधानभवनात आदळआपट करताना दिसतात. त्यांना तो राज्याचा अपमान वाटतो. कर्नाटकात गुन्हा दाखल झाल्यावर त्यांच्या बुडाला मिरच्या का झोंबल्या ? त्यांनी इतकी आदळआपट का केली ? असे प्रश्न पडल्यावाचून रहात नाहीत. त्यांना जर अजित पवार प्रकरणाबाबतचे मळभ दुर करायचेच आहे तर त्यांनी याबाबत महाराष्ट्रात गुन्हा का दाखल करून घेतला नाही ? जिथं कोंबड्या-कुत्र्यांच्या चोरीचे, हत्येचे गुन्हे दाखल होतात तिथे राज्याचा उपमुख्यमंत्री संशयास्पदरित्या मरतो त्याचा गुन्हा का दाखल करून घेतला जात नाही ? या मागचे कारण काय ? हा अस्वस्थ करणारा व संशयास जागा देणारा प्रश्न आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज्यात उघड-उघडपणे त्यांचा 'खून' च झाला अशी चर्चा सुरू आहे. राज्यात सर्वत्र हेच बोललं जातय. समाजाच्या सगळ्या थरात दबक्या आवाजात नव्हे तर उघडपणे लोक बोलत आहेत. तसेच सदरची हत्या अमित शहा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, फडणवीस, तटकरे व पटेल यांनीच केली असावी असे बोलत आहेत. अशा काळात अशोक खरात प्रकरण पुढे येते. सर्वत्र त्याचीच चर्चा घडवली जाते. खरातच्या रासलिलांचे व्हिडीओ खुराक वाटल्यासारखे समाज माध्यमात पुरवले जातात. सदरचे व्हिडीओ सोशल माध्यमात इतक्या मोठ्या संख्येने आले कसे ? ते कुणी पसरवले ? का पसरवले ? जर संबंधीत व्हिडीओ पोलिसांच्याकडे होते तर सोशल माध्यमात खिरापत वाटल्यासारखे कुणी पसरवले ?  त्यामागचे कारण काय ? हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे. खरातच्या ऑफीसबॉयने हे व्हिडीओ माध्यमात पसरवलेत की सरकारने  पसरवलेत ? याचा खुलासा होणे गरजेचे आहे. अजित पवारांच्या हत्येची लोकांच्यातली चर्चा थांबली जावी. सदरचे प्रकरण विसरले जावे यासाठी अशोक खरातच्या रासलिलांचा वापर केला जात असावा अस वाटतं. चोवीस तास माध्यमं केवळ अशोक खरात, अशोक खरात करताना दिसत आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री संशयास्पदरित्या मरतो, त्याचा गुन्हा दाखल होत नाही. त्यावर माध्यमातले लोक चर्चा करत नाहीत. सरकारला प्रश्न विचारत नाहीत. खरातचा भाऊ, बायको, सीए, ऑफीस बॉय, त्याच्याकडे जाणारे राजकारण्यांसकट विविध भक्त यांच्या बातम्यांचा रतीब घातला जात आहे. खरात हागत कसा होता ? खरात मुत कसा पाजत होता ? खरात कनेक्शन कुठे कुठे आहे ? हे दाखवण्यासाठी सर्वांचा आटापिटा चालू आहे. खरात हरामी आहे. तो नागडा झालाच पाहिजे पण इतकी तीव्रता, "तु माझी पार्वती, मी तुझा शंकर आहे !" म्हणून महिलांच्यावर बलात्कार करणा-या वैद्यबुवाच्या प्रकरणाला का नाही ? इतकी तीव्रता अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला का नाही ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पडत आहेत.      समाज माध्यमातून अशोक खरातच्या रासलिलांचे मुबलक व चमचमीत दर्शन आणि वृत्तवाहिण्यांवर त्याच्या बातम्यांचा रतीब घालण्यामागे नेमका काय खेळ खेळला जातोय ? माध्यमांना हाताशी धरत अजित पवार हत्या प्रकरण दडपण्याचा डाव खेळला जातोय का ? लोकांची दिशाभुल केली जातेय का ? असे प्रश्न या निमित्ताने पडत आहेत. अशोक खरातची सालटी सोला, त्याने बलात्कार केले असतील तर त्याचे गुप्तांग छाटा पण त्याच वेळी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत लोकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरंही जनतेला द्या. सदर प्रकरणाचा तपासही प्रामाणिकपणे व्हावा. त्याबाबत लोकांच्यात असणारे संभ्रमही दुर करा. देशाच्या प्रधानमंत्र्याबाबत, गृहमंत्र्याबाबत व राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत अशी चर्चा होणे योग्य नाही. सरकार या बाबत उदासिन का ? इतक्या मोठमोठ्या लोकांची नावे उघडपणे खून केला म्हणून घेतली जात असताना सरकार गप्प का ? माध्यमांनी या बाबतही आवाज उठवत रहायला हवं. जितकं महत्व अशोक खरात प्रकरणाला दिले जात आहे तेवढेच महत्व लोकांच्यात उपमुख्यमंत्र्याच्या मृत्यूबाबत सुरू असलेल्या चर्चेलाही द्यावं. त्याच्याही तशाच बातम्या कराव्यात असं वाटत. बाकी या प्रकरणाचा पाठपुरावा करणा-या रोहित पवार यांच्या हिम्मतीला दाद द्यावी लागेल. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री दादाला शरण गेल्यासारख्या वाटत आहेत. त्या फडणवीसांना दाभोळकरांचा वारसदार ठरवत आहेत. नाशिक येथे होणा-या कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटींचा आराखडा मांडणा-या आणि शिक्षणासाठी वाटाण्याच्या अक्षदा वाटणा-या भटबावळ्या माणसाला सुप्रिया सुळे नरेद्र दाभोळकरांचा वारसदार ठरवतात तेव्हाच त्या शरण गेल्याचे लक्षात येेते. एक तर त्या सत्तेला शरण गेल्या आहेत किंवा त्यांनी भांग प्यायला सुरूवात केली असावी असं या निमित्ताने वाटतं. शरण जाणारं माणूस किंवा भांग पिणारं माणूस लढू शकत नाही तेव्हा रोहित पवारांनीच ताकदीनं लढत अजित पवारांच्या मृत्यूचे सत्य बाहेर काढावं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages