सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक स्वागत समारंभ व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 8, 2026

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक स्वागत समारंभ व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

 सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक स्वागत समारंभ व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नवीन शैक्षणिक वर्ष २०२६–२७ च्या पार्श्वभूमीवर केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक स्वागत समारंभ तसेच दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. हा कार्यक्रम सिंहगड शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी शिक्षक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत नवीन शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
यानंतर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेला सुरुवात झाली. या कार्यशाळेत काशीबाई नवले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कमलापूर (ता. सांगोला) येथील प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, डॉ. एस. व्ही. जगताप, डॉ. एस. पी. कांगडे व प्रा. आर. एन. नदाफ यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान अध्यापन पद्धती, मानसशास्त्रीय सिद्धांत आणि प्रभावी धडा आराखडा (लेसन प्लॅन) या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संवादात्मक सत्रे, गटचर्चा व प्रात्यक्षिकांमुळे कार्यशाळा अधिक प्रभावी ठरली.
अभिप्राय सत्रात शिक्षकांनी या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका शाहीन शेख, उपमुख्याध्यापक प्रकाश नवले, उपमुख्याध्यापिका निकहत शेख व सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages