आरटीईतून १,८८० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; ७९३ जागा अद्याप रिक्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 29, 2026

आरटीईतून १,८८० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; ७९३ जागा अद्याप रिक्त

 आरटीईतून १,८८० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; ७९३ जागा अद्याप रिक्त




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षणाचा हक्क (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून आतापर्यंत १,८८० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. मात्र अजूनही ७९३ जागा रिक्त असून, उर्वरित विद्यार्थ्यांनी पुढील दोन दिवसांत प्रवेश पूर्ण करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील २८६ खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी एकूण २,६७३ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी १,८८० जागांवर प्रवेश पूर्ण झाला आहे. यंदा एकूण २,६७३ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले होते. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून सहा विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.

आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी दिली जाते. अंतिम मुदत जवळ आल्याने शाळा आणि शिक्षण विभागाकडून उर्वरित जागा भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

चौकट : तालुकानिहाय प्रवेश आकडेवारी
अक्कलकोट – ८५
बार्शी – ३०१
करमाळा – १२६
माढा – २६४
माळशिरस – २२२
मंगळवेढा – ६७
मोहोळ – ९१
पंढरपूर – २१०
सांगोला – १२७
उत्तर सोलापूर – ३२
दक्षिण सोलापूर – १०७
सोलापूर शहर – २४८
**एकूण – १,८८० प्रवेश**

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages