तेजस गायकवाडची एम पी एस सीत बाजी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2026

तेजस गायकवाडची एम पी एस सीत बाजी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

 तेजस गायकवाडची एम पी एस सीत बाजी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील माळेगाव येथील तेजस विशाल गायकवाड याने नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पद मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे माळेगाव गावातून प्रथमच पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान तेजस गायकवाड याने पटकावला असून गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

तेजस गायकवाड याने चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण टेंभुर्णी येथील खुळे वस्ती जिल्हा परिषद शाळेत घेतले. त्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण अकलूज येथील सहकार महर्षी विद्यालयात पूर्ण केले. पुढे पुणे येथील झिल नरे कॉलेजमधून मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अधिकारी होण्याचा ध्यास घेतला. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अखेर चौथ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळविले.

तेजस गायकवाड याच्या यशाची बातमी समजताच माळेगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी फटाके वाजवून तसेच गुलालाची उधळण करत सवाद्य मिरवणूक काढून त्याचे उत्साहात स्वागत केले. या वेळी गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला.

या यशाबद्दल आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवसेना नेते संजय कोकाटे, नूतन जिल्हा परिषद सदस्या सविताताई संजय कोकाटे, नूतन पंचायत समिती सदस्य पोपट अनपट, रावसाहेब देशमुख, ब्रह्मदेव मस्के, आबासाहेब वाघ, गोरख देशमुख, विठ्ठल गायकवाड, सरपंच सुदर्शन गायकवाड, हभप तुकाराम पाटील, किसन पाटील, तुकाराम डोके, संजय लोकरे, केशव गायकवाड, किशोर सलगर, सूर्यकांत किर्ते, वासुदेव पाटील, धोंडीराम गायकवाड, परमेश्वर लोकरे, बापूसाहेब पाटील आदी मान्यवरांनी तेजस गायकवाड यांचे अभिनंदन केले.

तसेच खुळे वस्ती जिल्हा परिषद शाळा, माळेगाव जिल्हा परिषद शाळा तसेच शेवरे, मिटकलवाडी, बेंबळे आदी गावांमधूनही तेजस गायकवाड याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages