गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन; ‘नाल्यातून गॅस’ प्रयोगाद्वारे निषेध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2026

गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन; ‘नाल्यातून गॅस’ प्रयोगाद्वारे निषेध

 गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन; ‘नाल्यातून गॅस’ प्रयोगाद्वारे निषेध



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात मंगळवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, कुंभार वेस नाल्याजवळ, सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘नाल्यातून गॅस काढण्याच्या’ संकल्पनेचा संदर्भ घेत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नाल्यातून गॅस तयार करण्याचा अभिनव प्रयोग करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. या प्रयोगाद्वारे सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांची खिल्ली उडवत जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेसमोर हे मोदी बाबा, हे मोदी बाबा, मेरी लाज रख लो आज, नाले से गॅस निकालो आज, चाय पकोडे बनालो आज, अशी आरती केली आणि नाले का गॅस का सपना दिखाना बंद करो, गॅस सिलेंडर सस्ता करो असे म्हणत गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

या आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सोलापूर शहर काँग्रेस ई-ब्लॉकचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते यांनी विशेष परिश्रम घेतले.

 यावेळी बोलताना चेतनभाऊ नरोटे यांनी घणाघाती आरोप करताना म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या व जनविरोधी धोरणांमुळे देशात गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना दिवसेंदिवस रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे अनेक लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नाल्यातून गॅस’ या भ्रामक संकल्पनेचा पर्दाफाश करण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनादरम्यान नाल्यातून गॅस तयार करण्याचा कथित प्रयोग सादर करण्यात आला. नाल्याजवळ उपकरणांच्या सहाय्याने गॅस निर्मितीचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात गॅस तयार न झाल्याने ही संकल्पना केवळ घोषणांपुरतीच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले.
पुढे बोलताना चेतनभाऊ नरोटे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करत सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशातील गॅस सिलेंडरचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून लोकांना रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही. ‘नाल्यातून गॅस’ काढण्याचे जे ‘निंजा टेक्निक’ सांगितले जाते, ते प्रत्यक्षात फसवे ठरत आहे. आज आम्ही स्वतः प्रयोग करून पाहिला, मात्र गॅस तयार झाला नाही. यावरून स्पष्ट होते की, सरकार केवळ घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल करत आहे. वाचाळवीरासारखे राजकारण करून देशाच्या हितापेक्षा सत्तेचे राजकारणच पुढे नेले जात आहे.” या आंदोलनाद्वारे काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या फसव्या आश्वासनांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व तुटवडा दूर करावा, अशी जोरदार मागणी केली.

यावेळी ई-ब्लॉकचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते म्हणाले की, “गॅस सिलेंडर बुकिंगचे दिवस वाढवून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. प्रत्यक्षात बुकिंग केल्यानंतरही नागरिकांना गॅस एजन्सीसमोर तासन्‌तास, दिवसेंदिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. एकीकडे सरकार गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे सर्वत्र लागलेल्या रांगा सरकारचे अपयश उघड करत आहेत. सणासुदीच्या काळात स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्याने महिला भगिनी, हॉटेल व्यावसायिक आणि लघुउद्योजक प्रचंड अडचणीत आले आहेत. हे सरकार केवळ घोषणा आणि दिखाव्यापुरते मर्यादित असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या धोरणांविरोधात जागरूक होणे गरजेचे आहे.” अन्यथा देशावर खूप वाईट परिस्थिती येणार आहे.

याआंदोलनात यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रदेश सचिव राहुल वर्धा, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी नगरसेवक दत्तू अण्णा बंदपट्टे, सिद्धराम चाकोते, भारतीताई इप्पलपल्ली, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, सुमनताई जाधव, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, माजी नगरसेविका शोभा बोबे, संध्या काळे, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, नूर अहमद नालवार, सुनील सारंगी, धीरज खंडारे, सचिन पवार, अभिषेक गायकवाड, श्रीनिवास परकीपंडला, आप्पाजी गायकवाड, शिवाजी साळुंखे, चंद्रकांत टिक्के, हणमंतु रुपनर, मोहसीन फुलारी, जब्बार शेख, अभिलाष अच्युगटला, श्रीनिवास कोटा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages