तेहतीस ठिकाणी इलेक्ट्रिक पंपसेट बसविण्यास स्थायी समितीची मंजुरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 28, 2026

तेहतीस ठिकाणी इलेक्ट्रिक पंपसेट बसविण्यास स्थायी समितीची मंजुरी

 तेहतीस ठिकाणी इलेक्ट्रिक पंपसेट बसविण्यास स्थायी समितीची मंजुरी

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  शहरातील हातपंप असलेल्या ठिकाणी बिंधन विहिरींवर इलेक्ट्रिक पंपसेट बसविण्याच्या कामांना पूर्ण माहिती व खातरजमा करून स्थायी समितीने मंजुरी दिली. शहरातील ३३ ठिकाणी २५ लाख रूपये खर्च अपेक्षित असून, कोटणीस कॉम्प्लेक्स येथील विकासकामांनाही हिरवा कंदील देण्यात आला.


महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील विविध भागांमधील हातपंप काढून त्या ठिकाणी असलेल्या विंधन विहिरींवर इलेक्ट्रिक पंपसेट बसविण्यासंबंधीचे प्रस्ताव तसेच मक्तेदारांना याचे काम देण्याच्या विषयांना मान्यता देण्यात आली. 


वेगवेगळ्या चार प्रस्तावांमध्ये प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मधील ६ ठिकाणी, प्रभाग क्रमांक ६, ७, ८ मधील विविध ७ ठिकाणी, प्रभाग क्रमांक २२ आणि परिसरातील प्रभागांमध्ये नागरी घनकचरा व तत्सम उपाययोजनेंतर्गत प्रभाग ६ मधील १० ठिकाणी तसेच याच योजनेंतर्गत याच परिसरातील आणखी १० ठिकाणी तेथील हातपंप काढून त्या ठिकाणी असलेल्या विंधन विहिरींवर इलेक्ट्रिक पंपसेट बसविण्याच्या विषयाला मान्यता देण्यात आली आहे.


महापालिका क्षेत्रात नागरी दलितेत तर सुधार योजना २०२५-२६ या योजनेअंतर्गत महापालिकेच्या  मालकीच्याअसलेल्या कोटणीस कॉम्प्लेक्स येथे नागरी सेवा सुविधांची विविध कामे करण्यात येणार आहेत. यापूर्वी याचे २ कोटी ३५ लाखांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले होते. त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. याची निविदा मात्र १ कोटी ९७ लाख ५४ हजार इतकी ठरविण्यात आली. याचे काम मक्तेदार एस. डी. कलकुटगी यांना देण्याचा प्रस्ताव देखील स्थायी समितीने एकमताने मंजूर केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages