शिवसेनेचे ‘जागर पाण्याचा’ आंदोलन; पाणीप्रश्नावर तीव्र भूमिका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 28, 2026

शिवसेनेचे ‘जागर पाण्याचा’ आंदोलन; पाणीप्रश्नावर तीव्र भूमिका

 शिवसेनेचे ‘जागर पाण्याचा’ आंदोलन; पाणीप्रश्नावर तीव्र भूमिका

सोलापूर (कटूसत्य वृत्त) – शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray faction) पक्षाच्या वतीने इंद्रभुवन परिसरात ‘जागर पाण्याचा’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त Sachin Ombase यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

शहरात अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निवेदनात “निवडणुकीपूर्वी दिलेले दररोज पाणीपुरवठ्याचे आश्वासन तात्काळ पूर्ण करावे” अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच नियोजनबद्ध, स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासोबतच पाणीपुरवठा यंत्रणेचे तांत्रिक ऑडिट करून त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

पाणीप्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या आंदोलनात जिल्हाप्रमुख डॉ. अजय दासरी, दक्षिण तालुका विधानसभा संपर्कप्रमुख गिरीश अकरे, विधानसभा प्रमुख शशी बिराजदार, शहर प्रमुख नाना मोरे, जिल्हा संघटक जगदीश कलकेरी, शहर समन्वयक सुरेश शिंदे यांच्यासह रवी नागणकेरी, शरणराज केंगनाळकर, दत्ता रुचनभैरे, रमेश शिखरे, सायराबानू मुलानी, अशोक बोकेवाले, रवी म्हेत्रे, अजय खांडेकर, सुमित भांडेकर, योगेश धनिवाले, समीउल्ला शेख, इब्राहिम पीरजादे, सुमन सोनकांबळे, ललिता सावळगी, मिता राठोड, प्रशांत कावळे, महेश खसगे, बाबा आडसुळे, पंकज गजाकोश, राजाभाऊ कुसेकर, नागेश पारडे, उदय पवार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages