दुर्गंधीचा विळखा आणि कचऱ्याचे ढीग!
सोलापूर शहरात आरोग्याचा प्रश्न गंभीर; नागरिक त्रस्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील घनकचरा व्यवस्थापन कुचकामी ठरल्याने कचरा आणि दुर्गंधीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रोज सुमारे ४२० टन कचरा निर्मिती होत असताना, सुमारे २० टक्के कचरा (सुमारे ७०-८० टन) गोळा न होता शहरात, रस्त्यांवर व मोकळ्या जागेत साचून राहतो.
घंटागाड्यांची अनियमितता, खासगीकरणानंतरची खराब कामगिरी आणि कचरा डेपोतील आगींमुळे नागरिक त्रस्त आहेत.
दररोज सुमारे ४२० मेट्रिक टन कचऱ्यापैकी केवळ ३५० टन कचरा गोळा केला जातो, तर उर्वरित कचरा शहरातच पडून राहतो. घरोघरी कचरा गोळा करणाऱ्या गाड्या नियमित येत नसल्याने नागरिक कचरा रस्त्यावरफेकत आहेत.कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता कमी पडत असून, कचऱ्याचे ढीग साचत आहेत. दुर्गंधी आणि कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढला आहे. महापालिकेने खासगीकरण केले असले तरी, प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे समस्येत वाढ झाली आहे.
नागरिकांनी ओला आणि सुका
कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकल्यास ही समस्या कमी होऊ शकते. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहराच्या उपनगरीय भागात कचऱ्याचे ढीग साचून आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. काही भागांत घंटागाड्या नियमित येत नसल्यामुळे कचरा उघड्यावर टाकला जातो,
शहरातील दुर्गंधी कमी करण्याचा प्रयत्न
घंटागाड्यातील कचरा रस्त्यावर येऊ नये, याची काळजी घेण्याची सूचना वारंवार दिली जाते. कचरा संकलन केंद्रातील दुर्गंधीबाबत आलेल्या तक्रारींची माहिती घेऊ. दुर्गंधीवर उपाय केले जातील. रूपाभवानी मंदिर परिसरात संकलन केंद्र बंदिस्त करण्याचे काम सुरू आहे, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. दुर्गंधी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून दुपारच्या सत्रातही कचरा उचलण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत कचरा संकलन करून शहरातील दुर्गंधी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ज्यामुळे पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात दुर्गंधीचे प्रमाण अधिक वाढते. रूपाभवानी मंदिर चौकात येणाऱ्या घंटागाड्यातील कचरा अनेकदा रस्त्यावर पडलेला असतो. कचरा संकलन केंद्रातून दुर्गंधी येते. पॉलिटेक्निकमध्ये येणाऱ्या मुलींना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. दुर्गंधी येऊ नये म्हणून सातत्याने रासायनिक प्रक्रिया करायली हवी. अन्यथा हा डेपो इतरत्र स्थलांतरित करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. जुळे सोलापूर पाणी टाकी येथील कचरा संकलन केंद्रातील दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिकांना सातत्याने होतो. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संकलन केंद्रांना महिन्यातून एकदा भेट दिली पाहिजे.

No comments:
Post a Comment