पालकमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा देणारे राम जाधव नजरकैदेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2026

पालकमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा देणारे राम जाधव नजरकैदेत

 पालकमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा देणारे राम जाधव नजरकैदेत




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते राम जाधव यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत कार्यक्रम उधळण्याचा इशारा देत संयोजक माऊली पवार यांच्या विरोधातही तीव्र भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले होते.

संभाव्य कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून राम जाधव यांना त्यांच्या कार्यालयातच नजरकैदेत ठेवण्यात आले.

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील नगरसेवकांचा सत्कार सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आयोजित केला होता. मात्र, सोलापूरचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असताना ते ओबीसी समाजाला दिल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अनेक दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी जबाबदार धरत आंदोलन केले जात आहे. त्यांचा एक भाग म्हणून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा सत्कार सोहळा उधळून लावत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी दिला होता.

त्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कडक सुरक्षा व्यवस्थेत सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, या कार्यक्रमात मराठा समाजातील तब्बल आठ नगरसेवकांनी अनुपस्थिती दर्शविल्याचे वास्तव समोर आले.

पवारांच्या प्रतिमेला मारले जोडे

सत्कार सोहळ्यास सकल मराठा समाजाचा विरोध असतानाही कार्यक्रम घेण्यावर संयोजक ठाम असल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संयोजक माऊली पवार यांच्या प्रतिमेस चार पुतळा परिसरात जोडे मार आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाचा गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमाकडे सत्कार मूर्तींची पाठ

कार्यक्रमावर वादाचे सावट असल्याने मराठा समाजातील श्रध्दा पवार, अमोल शिंदे, प्रियदर्शन साठे, जयकुमार माने, मनोरमा सपाटे, पूनम काशिद हे नगरसेवक गैरहजर राहिले. नूतन खासदार प्रा. ज्याती वाघमारे सत्कार मूर्ती असतानाही त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages