नातेपुते नगरपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसूली जोमाने,२७ थकीत नळ कनेक्शन कट- मुख्याधिकारी शिंगाडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

नातेपुते नगरपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसूली जोमाने,२७ थकीत नळ कनेक्शन कट- मुख्याधिकारी शिंगाडे

 नातेपुते नगरपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसूली जोमाने,२७ थकीत नळ कनेक्शन कट- मुख्याधिकारी शिंगाडे





नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते नगर पंचायतीच्या ह‌द्दीतील मालमत्ता धारकांकडून आर्थिक वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर, गाळे भाडे तसेच पाणीपट्टीच्या वसुलीची विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहीम मध्ये घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली जोमाने होत असून सदर पाणीपट्टी थकीत असलेले २७ जणांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले असल्याची माहिती नातेपुते नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी विकास शिंगाडे यांनी दिली.असून उर्वरित थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करणेत येणार असलेबाबत संबंधितांना नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन सूचित करण्यात आले असल्याचेही शिंगाडे यांनी सांगितले.महाराष्ट्र नगरपरिषद,औ‌द्योगीक नागरी अधिनियम १९६५ नुसार मालमत्ता धारकांनी थकीत व चालू मालमत्ता कर, गाळे भाडे व पाणीपट्टी यांची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे. जे मालमत्ता धारक विहित मुदतीत थकबाकी भरणार नाहीत अशांच्या संकलित करावर दरमहा २% दंड स्वरूपात व्याजाची आकारणी नगरपंचायतीकडून करण्यात येत आहे.शासन नियमातील तरतुदीनुसार मालमत्ता सील करणे, गाळा सील करून नगर पंचायतीच्या ताब्यात घेणे, पाणीपुरवठा नळ कनेक्शन बंद करणे, थकीत मालमत्ता व नळ कनेक्शन धारकांची नावे शहरातील प्रमुख चौकाचौकात प्रसिद्ध करणे यांसारखी कारवाई करण्याचे नियोजन नगरपंचायत वसुली विभाग यांनी केलेले आहे. त्यानुसार नगर पंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी वसूली मोहिमेत सहभागी झाले असून घरपट्टी व पाणीपट्टी भरणे बाबत घरोघरी जाऊन सूचना देत आहेत. तसेच घंटागाडी व रिक्षाद्वारे थकबाकी भरणे बाबत नागरिकांना जागृत करून आवाहन करण्यात आले आहे. घरपट्टी व पाणीपट्टी भरून घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालय सुट्टीदिवशी देखील सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नातेपुते नगरपंचायत हद्द येथील नागरिकांनी व्याज आकारणी टाळण्यासाठी मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कर, गाळा भाडे पाणीपट्टी नगर पंचायतीच्या कार्यालयात येऊन तत्काळ भराव्यात अन्यथा  थकबाकी दारांचे नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई पाणीपट्टी विभागामार्फत सुरू केली असल्याचेही मुख्याधिकारी विकास शिंगाडे यांनी सांगितले. नातेपुते नगर पंचायतीच्या हद्दीतील मालमत्ता व नळ कनेक्शन धारक यांनी थकीत व चालू घरपट्टी व पाणीपट्टी कराचा भरणा नगर पंचायत कार्यालयात लवकरात लवकर येऊन भरावे असे आवाहनही नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने थकीतदारांना केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages