देगावमध्ये गॅस दाहिनी सुरू, अंत्यसंस्कार खर्चात होणार बचत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देगाव स्मशानभूमीतील गॅस दाहिनीचा प्रश्न उपस्थित होताच महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करत ही सुविधा बुधवारपासून कार्यान्वित केली आहे. स्थायी समिती सदस्य तथा प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक गणेश वानकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा मांडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
गॅस दाहिनी सुरू झाल्यामुळे अंत्यसंस्काराचा खर्च कमी होणार असून पर्यावरणपूरक पद्धतीला चालना मिळणार आहे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत गॅस दाहिनीमुळे प्रदूषणात घट होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.
बुधवारी सकाळी नगरसेवक गणेश वानकर यांनी देगाव येथील नागरिकांसमवेत स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गॅस दाहिनीची कार्यपद्धती, सुविधा व देखभाल याबाबत सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, गॅस दाहिनी परिसरात काही कामे अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना वानकर यांनी प्रशासनाला दिल्या.
या पाहणीवेळी संतोष दांडगे, प्रभाकर नाना कोठे, सुधाकर भाऊ काळे, शिवाजी जाधव, योगेश कोळी, अभिजित सावकार सुपाते, अमर कस्तुरे, संभा वाघ, गोटू ताकमोगे, नितीन कोठे, योगी कोळी, अरुण भैया जाधव तसेच विद्युत विभागाचे अभियंता प्रतीक कोल्हे उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment