माळेगाव येथे दीपक केदार यांच्या उपस्थितीत शाखा उद्घाटन संपन्न. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

माळेगाव येथे दीपक केदार यांच्या उपस्थितीत शाखा उद्घाटन संपन्न.

 माळेगाव येथे दीपक केदार यांच्या उपस्थितीत शाखा उद्घाटन संपन्न.




टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील माळेगाव येथे 23 मार्च रोजी सामाजिक ऐक्याच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅंथर सेना शाखा उद्घाटन करण्यात आली. सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

आपल्या दमदार भाषणात दीपक केदार यांनी अनुसूचित जाती-जमातींवर होणाऱ्या वाढत्या अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडली तसेच गायरान जमिनी तातडीने अनुसूचित जाती-जमातींना वाटप कराव्यात, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा थेट इशारा त्यांनी शासनाला दिला.तसेच महिलांच्या शोषणाच्या प्रकरणात भोंदू खरात वरती कठोर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले.

यावेळी इक्वालिटी फाऊंडेशन संस्थापक महावीर वजाळे यांनी भाषणातून सांगितले की सामाजिक क्रांती टिकवण्यासाठी आर्थिक चळवळ उभी करणे अत्यावश्यक आहे. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन उद्योग-व्यवसाय उभारावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास नागनाथ वाघमारे, बबन किर्ते, नाथा सावंत, सूर्यकांत लोंढे, महेंद्र सोनवणे, नवनाथ रेपे, पोपट लोंढे, सुदर्शन गायकवाड, शहाजी गायकवाड, नागेश मस्के यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
तसेच शाखा पदाधिकारी तुकाराम गायकवाड, हनुमंत लोंढे, क्रांतीदीप लोंढे, सत्वशील लोंढे, सचिन पवार, अमोल शिरतोडे, सिद्धार्थ लोंढे, विकास कांबळे, नवनाथ गाडे, संतोष कांबळे, बाळू लोंढे, निलेश कांबळे, मल्हार थोरात आदी उपस्थित होते.

माळेगावातील शाखा उद्घाटन कार्यक्रमातून सामाजिक न्याय, आर्थिक सक्षमीकरण आणि संघटन बळकटीकरणाचा ठाम संदेश देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages