सोलापूर शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

सोलापूर शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

 सोलापूर शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यावतीने शहरातील मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षकांसाठी एकदिवसीय शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
 शुक्रवार दि.२७ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उदघाटन शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांच्या हस्ते, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.या कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा अध्यापनात प्रभावी वापर, अध्यापनासाठी उपयुक्त AI Tools चा उपयोग तसेच शाळा व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अध्यापन अधिक परिणामकारक करण्याची संधी मिळणार आहे.या बदलत्या शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाची भूमिका अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.शिक्षण क्षेत्रातील नव्या प्रवाहांना दिशा देणारा हा उपक्रम असल्याने या कार्यशाळेस सोलापूर शहर व परिसरातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  सोलापूर शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages