श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह संपन्न
वेणुनगर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यस्थळावर दिनांक ४ मार्च ते ११ मार्च २०२६ या कालावधीत ५५ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आयोजन केलेले असून त्यानिमित्त कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांच्या उपस्थित सर्व अधिकारी, कामगार व सर्व उपस्थितांनी सुरक्षिततेची शपथ ग्रहन केली.
दरवर्षी देशात सर्व ठिकाणी औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करणेत येत असून औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेला फार महत्व आहे. सुरक्षेचे नियम केवळ या सप्ताहापुरतेच मर्यादित न ठेवता आयुष्यभर सुरक्षानियमांचे सर्वांनी पालन करणेबाबत कामगारांना मार्गदर्शन करणेत आले. तसेच काम करीत असताना अपघात होवून स्वत:वर व आपल्यावरती अवलंबून असणाऱ्या कुटुंबावर परिणाम होवू शकतो याचे भान काम करीत असताना सर्वांनी ठेवले पाहिजे. तसेच आयुष्यभर अपघात विरहित काम करून स्वतः बरोबर आपलें कुटुंब सुरक्षित राहवे याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे, असे मत कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सुरक्षा अधिकारी व्ही. जे. माळी यांनी सुरक्षा उपकरणांविषयी सुरक्षततेविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर यु. के. तावरे, केन मॅनेजर ए. डी. वाघ, लेबर अॅन्ड वेलफेअर ऑफीसर बी.एस.पाटील, केनयार्ड इन्चार्ज जे. ए. सलगर, गोडावून किपर एस. व्ही. घोरपडे, हेड टाईम किपर एस.एस.जगताप, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग व सुरक्षा विभागातील अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार बहुसंख्येने उपस्थित होते.
.jpeg)
No comments:
Post a Comment