आरोग्य क्षेत्रातील नोकरी केवळ उपजीविकेचे साधन नसून मानव सेवेची संधी- हिवरकर-पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 13, 2026

आरोग्य क्षेत्रातील नोकरी केवळ उपजीविकेचे साधन नसून मानव सेवेची संधी- हिवरकर-पाटील

 आरोग्य क्षेत्रातील नोकरी केवळ उपजीविकेचे साधन नसून मानव सेवेची संधी- हिवरकर-पाटील




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते व परिसरातील ग्रामीण भागातील राहणाऱ्या मुला मुलींसाठी नातेपुते ठिकाणी राजगड नॉलेज सिटी अलाईड अँड हेल्थकेअर इन्स्टिट्यूटमध्ये अकरावी व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी राजगड नॉलेज सिटी च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील नोकरी केवळ उपजीविकेचे साधन नसून मानवसेवेची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आसल्याचे मत राजगड नॉलेज सिटीचे चेअरमन राजकुमार हिवरकर पाटील यांनी माहिती देताना व्यक्त केले.विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण व आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने राजगड नॉलेज सिटी अँड हेल्थकेअर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील रेडिओलॉजी टेक्निशियन, एक्स-रे, ब्लड बँक लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्नॉलॉजी, डायलेसिस असे विविध कोर्सेस पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील शंकरराव कॉम्प्लेक्स  येथे असलेल्या या संस्थेत इयत्ता १० वी, 12 वी कला वाणिज्य व विज्ञान शाखांचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे संस्थेला नवी दिल्ली येथील सेंट्रल बोर्ड ऑफ ओपन स्कूलिंग अँड एक्झामिनेशन ची मान्यता मिळालेली असून विद्यार्थ्यांना नेहमीच शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षा ची तयारी येथे करून दिली जाणार असल्याचेही हिवरकर पाटील यांनी सांगितले. या स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन सुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. नातेपुते व परिसरातील विद्यार्थ्यांना या कोर्सेस साठी पुणे, सातारा, बारामती, फलटण, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मिरज अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत होते. मात्र नातेपुते या ठिकाणी राजगड नॉलेज सिटी अलाईड अँड हेल्थकेअर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी मिळाली असल्याने विद्यार्थ्यांची बाहेर जाण्याची पळापळी थांबणार असून विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात करिअरच्या अफाट सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत. सरकारी रुग्णालय, खाजगी रुग्णालय, रेल्वे, महानगरपालिकेत, आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणातून नोकरीची संधी उत्तम पगार, समाजात मानसन्मान नोकरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.आर्थिक दृष्ट्या दुर्बल व शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट साक्षात उतरवण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केला जात आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन राजगड नॉलेज सिटी व राजगड विद्यामंदिरचे चेअरमन राजकुमार हिवरकर पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages