भीम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दहाव्यांदा वीरेंद्र हिंगमिरे यांची निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त): येथील भीम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सलग दहाव्यांदा वीरेंद्र हिंगमिरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
संस्थापक दलितमित्र सूर्यकांत (बाबा) बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानच्या विविध पदांवरही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यामध्ये सचिवपदी अकबर शेख, उपाध्यक्षपदी विशाल मस्के, सल्लागारपदी स्वाती मस्के व अमित बाबरे, कार्याध्यक्षपदी सिद्धांत बाबरे यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून भीमराव माने, वैभव लोखंडे, शशांक माने, नीरज भालेराव, किरण गायकवाड, मारुती खानापुरे, सिद्धांत गायकवाड आणि संतोष कदम यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर वीरेंद्र हिंगमिरे यांचा भीम प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment