युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2026

युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता

 युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- युद्धाची धग गॅस सिलेंडरपासून चुलीपर्यंत पोचल्यानंतर आता शेतीच्या क्षेत्रातही खताची भाव वाढ होण्याची शक्यता समोर आली आहे. खत निर्मितीच्या कच्च्या मालाच्या आयातीमुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते असे मानले जात आहे.

प्रामुख्याने युरिया व डीएपी ही दोन खते महत्त्वाची मानली जातात. सध्या या दोन्ही खतावर केंद्राने सबसिडी देऊन भाववाढीचा ताण येणार नाही अशी व्यवस्था केली आहे. मात्र या खताच्या निर्मितीसाठी अनेक घटक आयात करावे लागतात. आयात घटकांचे दर वाढत असताना त्याचा ताण दरवाढीत दिसू शकतो. त्यामुळे येत्या खरीप हंगामात खताचे भाव वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

आधीच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहेत. लागवडीला जितका खर्च केला तितकाही पिके व धान्य विकून मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. हवामान बदल, अतिवृष्टी, महापूर यामुळेही यंदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई होण्यासाठी शेतकरी पीकविम्याच्याही प्रतीक्षेत आहेत. त्याची किती रक्कम आणि केव्हा पदरात पडेल याचीही शाश्‍वती नसताना आता युद्धामुळे खतांचे भाव वाढणार असल्याने हे शेतकऱ्यांवर नवे सुलतानी संकट मानले जात आहे.

बदलती स्थिती

जगातील एकूण खत व्यापारापैकी जवळपास ३० ते ३५ टक्के खताचा व्यापार या होमुर्झ खाडी मार्गाने होतो.

मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यांतच जागतिक बाजारपेठेत युरियाच्या किमतीत २१ ते २९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

नायट्रोजनयुक्त खतांच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला नैसर्गिक वायू (नॅचरल गॅस) आणि फॉस्फेटसाठी लागणारा गंधक (सल्फर) यांच्या पुरवठ्यात अडथळे येत आहेत. नैसर्गिक वायूच्या किमतीत अचानक ४५ टक्के वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे.

येथून खताच्या कच्च्या मालाची आयात

नैसर्गिक वायू - कतार, सौदी अरेबिया, ओमान

रॉक फॉस्फेट - मोरोक्को, जॉर्डन, इजिप्त

फॉस्फरिक ॲसिड - मोरोक्को, सेनेगल, जॉर्डन

सल्फर - सौदी अरेबिया, युएई, इराण

पोटॅश - कॅनडा, बेलारूस, रशिया

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages