सोलापूर बाजार समितीत तीन दिवस कांदा लिलाव बंद; शेतकऱ्यांना आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त): श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा लिलाव शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत लिलाव होणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा आणू नये, असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
रमजान ईद चंद्र दर्शनावर अवलंबून असल्याने शुक्रवार (दि. २० मार्च) व शनिवार (दि. २१ मार्च) या दोन दिवसांसाठी व्यापाऱ्यांनी ईदनिमित्त सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर रविवार (दि. २२ मार्च) रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने बाजार समितीचा कारभार पूर्णपणे बंद राहणार आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कांदा व्यापारी व बाजार समिती प्रशासन यांची संयुक्त बैठक गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे ईदनिमित्त दोन दिवस सुट्टी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस नसीर अहमद खलिफा, सादिक बागवान, केदार उंबरजे, रेवनसिद्ध आवजे, रियाज बागवान, जुबेर बागवान आदी उपस्थित होते.
दरम्यान, भविष्यात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कांदा लिलावाच्या वार्षिक सुट्ट्यांची यादी नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आगाऊ माहिती मिळून नियोजन सुलभ होईल, अशी माहिती श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट शिखर संघटनेचे उपाध्यक्ष सादिक बागवान यांनी दिली.
No comments:
Post a Comment