माळीनगर गट नंबर दोन येथे म.फुले उद्यानाचे उदघाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 2, 2026

माळीनगर गट नंबर दोन येथे म.फुले उद्यानाचे उदघाटन

 माळीनगर गट नंबर दोन येथे म.फुले उद्यानाचे उदघाटन



         

माळीनगर (कटूसत्य वृत्त):- दि. सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित,प्राथ. शाळा क्र. ३ माळीनगर गट नंबर दोन येथे महात्मा फुले उद्यानाचे उदघाटन व माजी विद्यार्थी सन्मान सोहळा आज गुरुवार दि.२६ फेब्रुवारी रोजी दि. सा.मा. एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे, खजिनदार ज्योतीताई लांडगे आणि  संचालक पृथ्वीराज भोंगळे यांच्या हस्ते संपन्न झाला.
            प्राथमिक शाळेच्या मैदानामध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या उद्यानातील विद्यार्थ्यांसाठीची सर्व खेळणी दि.सासवड माळी शुगर फॅक्टरीचे  व एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या सहकार्यातून मिळाली.
              कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी  अजय गिरमे हे होते.यावेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले शाळेचे माजी विद्यार्थी प्रा.डॉ.गणेश गोरख धायगुडे यांनी वाणिज्य शाखेतून पीएचडी पदवी  मिळवल्याबद्दल आणि कु.अश्विनी कैलास निकम यांची कृषी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल या दोघांचाही सन्मान अजय गिरमे, ज्योतीताई लांडगे, पृथ्वीराज भोंगळे आणि डॉ.संजय घोंगणे यांच्या हस्ते करण्यात आला. 
            या कार्यक्रमास अविनाश पांढरे,माजी सैनिक महादेव देवकर,श्री.निकम, जहांगीर तांबोळी, मीनानाथ मांडवे, विठ्ठल धायगुडे, नेहरू काळे, संतोष करडे,शिक्षक गोविंदा काळे,वंदना बंडगर,आदी पालक,माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
            यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जितेंद्र लांडगे,समीर लोणकर, आणि जयसिंह कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळा आणि शिक्षकांचे कौतुक केले.तसेच राजेंद्र भोसले, प्रा.डॉ.गणेश धायगुडे,आणि कु.अश्विनी निकम यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी खाऊ भेट दिला.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका ललिता नागटिळक यांनी केले. तसेच सूत्रसंचालन स्मिता म्हेत्रे आणि उज्वला देवकाते यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचा सन्मान शिक्षक प्रवीण खरात व गौरी शिंदे यांनी केला.
               शेवटी या कार्यक्रमाचे आभार वैजिनाथ भोसले यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages