मूलभूत गरजांसाठी मी सदैव तत्पर- डॉ.धवलसिंह मोहिते पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 30, 2026

मूलभूत गरजांसाठी मी सदैव तत्पर- डॉ.धवलसिंह मोहिते पाटील

 मूलभूत गरजांसाठी मी सदैव तत्पर- डॉ.धवलसिंह मोहिते पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांसाठी मी सदैव तत्पर राहीन असे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) नेते डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील म्हणाले.

माळशिरस तालुक्यातील गिरझणी  गावातील, साठे वस्ती व हेगडे वस्ती येथे अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा  बंद अवस्थेत होता. बोअरवेल संदर्भात ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.
 
डॉ. धवलदादांनी गिरझणी गावातील ग्रामस्थांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत, बोअरमध्ये नवीन मोटार बसवून,पाणीपुरवठा पुन्हा सुरू करून देत शुभारंभ केला.
प्रसंगी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत करून, मोटरीचे पूजन करण्यात आले व पाणी  पूजनही करण्यात आले.
         यावेळी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की ग्रामस्थांना पाण्याची सोय करून देणे ही आपली जबाबदारी आहे, आणि पुढेही अशा मूलभूत गरजांसाठी मी सदैव तत्पर राहीन असे म्हणाले. यावेळी त्यांनी हेगडे वस्ती येथे रस्त्याची पाहणी करून पंचायत समितीला सूचना दिल्या.

याप्रसंगी दादासाहेब नामदास,.सागर देशमुख,.शंकर चव्हाण,  पत्रकार कृष्णा लावंड,सुभाष साठे,  बापू साठे  विजय लोखंडे  सतीश भिंगारदिवे,  साधू साठे,  हमु साठे,मच्छिंद्र हेगडे,अवि साठे इत्यादी गिरझणी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages