जनगणना २०२७ चे प्रशिक्षण अत्यंत काळजीपूर्वक घ्यावे- निवासी उपजिल्हाधिकारी पाटील
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतातील सर्वात मोठी जनसहभागाची मोहीम, जनगणना २०२७, लवकरच सुरू होत आहे. ही केवळ एक गणना नाही, तर हा 'विकसित भारत @ २०४७' चा पाया आहे. स्वातंत्र्यानंतरची ही सोळावी जनगणना आहे. ही जनगणना एकूण तीन टप्प्यात होणार आहे. सध्या जनगणनेशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार असून १ एप्रिल २०२६ पासून प्रत्यक्ष फील्ड ट्रेनिंग दिले जाणार आहे. तरी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी जनगणने विषयक प्रशिक्षण अत्यंत काळजीपूर्वक घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सोलापूर जिल्हा जनगणना 2027 प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक किरण गुरव (जनगणना कार्यालय, मुंबई), पवन गोडे (राष्ट्रीय प्रशिक्षक, जनगणना कार्यालय, मुंबई), जिल्हा समन्वयक (सोलापूर) अभिजीत भांड, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन व मास्टर ट्रेनर सुशांत बनसोडे, सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मास्टर ट्रेनर तपन डंके यांच्यासह जनगणने विषयक सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा प्रशासनाने जनगणना 2027 कार्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, प्रशिक्षण कार्यक्रम व वेळापत्रक निश्चित केले असून, सर्व संबंधितांनी या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याची सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.
जनगणना कार्यक्रमाची वैशिष्ट्ये व टप्पे:-
- स्वातंत्र्यानंतरची ही १६ वी जनगणना आहे.
- जनगणना प्रक्रिया CEMS पोर्टल द्वारे पार पडणार आहे.
- स्वयंगणना कालावधी : १ मे २०२६ ते १५ मे २०२६
- घरगणना कालावधी : १६ मे २०२६ ते १४ जून २०२६
- शिरगणती : फेब्रुवारी २०२७
- फिल्ड ट्रेनिंग : १ एप्रिल २०२६ ते ६ एप्रिल २०२६.
जिल्ह्यातील जनगणना तयारी
- तालुके : ११
- नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत : १७
- HLB (House Listing Blocks) : ग्रामीण – 4409, नगरपरिषद – 1039, एकूण – 5448
- प्रगणकांची आवश्यकता : ग्रामीण – 4853, नगरपरिषद – 1151, एकूण – 6004
- पर्यवेक्षकांची आवश्यकता : ग्रामीण – 809, नगरपरिषद – 208, एकूण – 1017
- क्षेत्रीय प्रशिक्षक : 106
- मास्टर ट्रेनर्स : 3

No comments:
Post a Comment