वसईतही आढळला भोंदू अवतार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 28, 2026

वसईतही आढळला भोंदू अवतार

 वसईतही आढळला भोंदू अवतार

वसई(कटूसत्य वृत्त):-  राज्यात अशोक खरात या भोंदूबाबाचे अनेक चमत्कार उघडकीस येत असतानाच वसईतील एका पंडिताने आपण महादेवाचा अवतार असल्याचे सांगत पुण्यातील एका विवाहितेवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हा पंडित फरार झाला आहे.


वसईत धार्मिक कामे करणारा पंडित ऋषिकेश वैद्य नावाचा ४० वर्षीय अनेक सामाजिक उपक्रमातही सहभागी होता. त्यामुळे त्याच्या नावाची चांगली चर्चा होत होती. आता एका प्रकरणामुळे या वैद्यचे नवे रूप समोर आले आहे. आपण महादेवाचे अवतार असल्याचे भासवत त्याने पुण्यातील विवाहित महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हडपसर - मांजरी येथील एका लॉजवर नेऊन देवाचा प्रसाद म्हणून तिला गुंगीकारक औषध दिले. तिची शुद्ध हरपल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे विवस्त्र फोटोही काढले. या फोटोच्या आधारे ब्लॅकमेलिंग करून वैद्य सातत्याने पीडिच महिलेवर दबाव टाकत होता. ३१ डिसेंबर २०२३ पासून हा अत्याचार तिच्यावर सुरू होता. अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आल्यावर धीर एकवटून तिने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


याप्रकरणी पोलीस ठाण्यात झीरो एफआयआर दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ घटना पुणे - हडपसर येथील असल्याने पुढील तपासासाठी तो पुण्याला वर्ग केला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे माहिती मिळतात पंडित वैद्य फरार झाला आहे. या घटनेमुळे भोंदूगिरी आणि दैवी अवताराच्या नावाखाली महिलांच्या होणाऱ्या शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages