घरकुल पूर्ण होण्यासाठी दक्षिण पंचायत समितीचे बांधकाम अभियान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

घरकुल पूर्ण होण्यासाठी दक्षिण पंचायत समितीचे बांधकाम अभियान

 घरकुल पूर्ण होण्यासाठी दक्षिण पंचायत समितीचे बांधकाम अभियान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व लाभार्थींचे घरकुल पूर्ण होण्यासाठी दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी गुढीपाडवा ते रामनवमी म्हणजेच 19 मार्च ते दि. 26 मार्च या कालावधीत घरकुल बांधकाम आवास सप्ताह आयोजित केला आहे.

या अभियानाबाबतचे परिपत्रक गटविकास अधिकारी राऊत यांनी तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना वितरित केले आहे. केंद्र पुरस्कृत योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत घरकुल बांधकाम आवास सप्ताह आयोजित करण्याचे सूचित केले आहे. या आवास सप्ताहामध्ये घरकुल लाभार्थीचे मेळावे ग्रामपंचायत निहाय सरपंच यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करणेत यावेत. घरकुल लाभार्थी यांना घरकुल बांधकाम करणेसाठी येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने लाभार्थीनिहाय नियोजन करणेत यावे. तसेच ज्या घरकुल लाभार्थीचे करारनामा बाकी असतील त्यांचे तात्काळ करारनामा करावेत. करार झालेल्या लाभार्थीचे पायाभरणी संबंधीचे बांधकाम साहित्य जमा करणेस सहकार्य करावे. तसेच ज्या घरकुल लाभार्थीचे बांधकाम सुरु होऊन लिंटेलपर्यंत काम पुर्ण झालेले आहे. अशी सर्व घरकुले अभियान कालावधीमध्ये म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत तात्काळ पूर्ण करावीत. सदर अभियान कालावधीत सरपंच यांचे मार्गदर्शनाखाली अभियान यशस्वी होण्याकरिता संबंधित ग्रामपांचयतस्तर व पंचायत समिती घरकुल विभागस्तर यांनी सर्वतोपरी सहाय्य करून आपले योगदान देणार आहेत. पावसाळ्याआधी घरकुल पूर्ण व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा ग्राम विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे अभियानाद्वारे गरिबांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages