लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबीर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबीर संपन्न

 लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबीर संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजे रानमसले ता उत्तर सोलापूर येथे दिनांक 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमसले येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन हे लाभले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण कुलकर्णी, आत्माराम गरड दशरथ गरड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सरकाळे, प्रा. अपूर्वा पिस्के तसेच सर्व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आत्माराम गरड यांचा सत्कार स्वयंसेवक मुझमील शेख यांच्या हस्ते, दैनिक दिव्यामराठीचे  पत्रकार प्रवीण कुलकर्णी यांचा सत्कार स्वयंसेवक अगम जैन यांच्या हस्ते व दशरथ गरड यांचा सत्कार स्वयंसेवक श्रीकांत ढेरे यांच्या हस्ते शाल व रोप देऊन करण्यात आला. प्रवीण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व स्वयंसेवकांनी अतिशय उत्साहाने या शिबिरातील विविध उपक्रम राबविले तसेच (change is rule of life) परिवर्तन जीवनाचा नियम आहे या वाक्याद्वारे त्यांनी स्वयंसेवकांना जीवनाची एक अमोल व अनमोल गोष्ट समजून सांगितली. या रासेयो शिबीराअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळते. त्यांनी सर्व स्वयंसेवकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शिबीरामुळे विद्यार्थ्यांची ग्रामीण जीवनशैलीशी नाळ जोडली जाते व एक उत्तम नागरिक घडण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. तसेच या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक अशीच सरकाळे सर राबवलेल्या सर्व उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा झालेला विकास व त्यांची याबद्दल देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा व देशसेवाभाव रुजण्यासाठी मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना रुजून त्यांनी इतरांना मदत करावी व आपल्या देश पुढे नेण्यासाठी हातभार लावावा. यानंतर स्वयंसेवक अपूर्वा इरवाडकर, मुजामिल शेख , अगम जैनआदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वयंसेवक सावरी बिराजदार व भक्ती बिडवे यांनी केले. आभारप्रदर्शन स्वयंसेवक अमोघ वर्ष यानी व्यक्त केले. त्यानंतर सर्व रासेयो स्वयंसेवकांनी उपस्थित  अतिथिंकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी सप्रेम भेटवस्तू दिली. या सात दिवसाच्या शिबीराअंतर्गत रानमसले येथे ग्रामस्वच्छत, वृक्षारोपण, शोषखड्डे निर्मिती, महिलांसाठी मनोरंजनपर स्पर्धां, विविध शालेय स्पर्धा उपक्रम, रक्तदान शिबीर, ह.भ.प. अभिनंदन महाराज यांचे समाजप्रबोधपर प्रवचन, जनजागृती प्रभातफेरी, कृषी क्षेत्रातील तज्ञांची विविध विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने आदींचा समावेश होता. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रानमसले गावचे सरपंच मनोहर क्षिरसागर, उपसरपंच रमेश सुतार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकवृंद, रानमसले गावातील सर्व ग्रामस्थ तसेच रासेयो स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages