प्रभाग क्रमांक 26 मधील कृष्णा कॉलनी येथे रस्ते कामास सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

प्रभाग क्रमांक 26 मधील कृष्णा कॉलनी येथे रस्ते कामास सुरुवात

 प्रभाग क्रमांक 26 मधील कृष्णा कॉलनी येथे रस्ते कामास सुरुवात




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक 26 मधील कृष्णा कॉलनी येथे लक्ष्मी कंट्रक्शन कडून ड्रेनेजची कामे करण्यात आली होती परंतु माजी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्या निधीतून सदर नगरामध्ये रस्ते करण्यात आलेले होते. ड्रेनेज लाईन केल्यामुळे सदरचे रस्ते उखडले गेले होते ते रस्ते आहे त्या स्थितीत बनवून द्यावे ते असे संबंधित लक्ष्मी कंट्रक्शनला सोलापूर महानगरपालिका आयुक्त व शासनाचे आदेश आहेत. परंतु सदर कामास दिरंगाई होत होती सदर नगरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही दखल घेत नव्हते शेवटी सदर नगरातील नागरिकांनी ही बाब माजी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे
केवळ चारच दिवसात सदर ठिकाणी रस्ते कामाला सुरुवात करण्यात आली आहे.सदरचा रस्ता झाल्यामुळे लक्ष्मी कंट्रक्शन कडून सैफुल ते बॉम्बे पार्क पर्यंत जाणाऱ्या रोडवर ड्रेनेजचे काम चालू असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे सदरचा पर्यायी रस्ता झाल्यामुळे जुळे सोलापुरातील सर्वसामान्य नागरिकांना डी मार्ट,IMS कॉलेज, आसरा चौकाकडे जाण्यासाठी सोयीचे झाले आहे त्यामुळे सर्व थरातून माजी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांचे कामाचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages