अनगर विद्यालयात गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

अनगर विद्यालयात गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान

 अनगर विद्यालयात गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान




अनगर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला सोलापूर शाखेच्या वतीने पर्यवेक्षक राजेंद्र डोके, विलास गुंड, महादेव पवार, बजीरंग पाचपुंड, माधवी पाचपुंड व अल्मास बागवान यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याबद्दल मुख्याध्यापक महादेव चोपडे यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
तर मोहोळ या ठिकाणी सेवा सहयोग संस्थेकडून भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात यशस्वी झालेल्या जान्हवी भडकवाड,संकेत खताळ, ज्ञानेश्वरी खताळ, सोहम पासले, श्रीराज पासले यांचा तर प्रश्नमंजुषेत श्रवण यादव, उत्कर्ष माळी, अर्जुन काळे, यशराज गुंड व स्वरा भडकवाड यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यालयास मोहोळ तालुका चॅम्पियनशिपचे सन्मानचिन्ह मुख्याध्यापकाकडे प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेमध्ये स्वरा भडकवाड, समर्थ काळे, समीक्षा लवळे, प्रज्ञा शिंदे, प्रतीक पवार व उत्कर्ष माळी यांनी यश मिळवल्याबद्दल ज्येष्ठ विज्ञान शिक्षक परमेश्वर थिटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक महादेव चोपडे, उपमुख्याध्यापक माधव खरात' पर्यवेक्षक राजेंद्र डोके, सोमनाथ गुंड, हनुमंत गुंड,सुनिल सरक, किरण भडकवाड, अनुराधा गोडसे, अनिता लांडगे, रंजना सरक, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील, लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, संस्थाध्यक्षा प्रियांका पाटील नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील,मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, मुख्याध्यापक संजय डोंगरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages