एस .व्ही. सी. एस. प्रशालेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एस. व्ही. सी. एस. हायस्कूल एमआयडीसी येथे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी कवी कुसुमाग्रज व ग्रंथ दिंडीचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक धनंजय नकाते व पर्यवेक्षक केदार पटणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहशिक्षिका सविता पाटील यांनी श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानाविषयी माहिती दिली. अनुजा देशमुख या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केली. श्रेया सोनवणे हिने 'नटसम्राट' या नाटकातील एका प्रसंगावर आधारित एकपात्री अभिनय व अबोली क्षीरसागर हिने 'कौंतेय' या नाट्यसंवादासह 'कणा' ही कविता सादर केली. प्रशालेतील पाचवी ते नववी मधील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयास 2५५ पुस्तके भेट दिली. मराठी दिनानिमित्त प्रशालेत हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. यातील विजेत्या स्पर्धकांना मुख्याध्यापकांच्या हस्ते साहित्यिकांची पुस्तके देऊन गौरविण्यात आले. मराठी भाषेचे गौरव करणाऱ्या गीतावर इयत्ता सातवी व नववी वर्गातील विद्यार्थिनींनी बहारदार समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तेजस्वी निकंबे हिने सूत्रसंचालन तर अन्नपूर्णा कलशेट्टी हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील सर्व प्राध्यापक -प्राध्यापिका, शिक्षक- शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment