शंकरराव मोहिते महाविद्यालय कॅालेज कट्टा उपक्रम संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 2, 2026

शंकरराव मोहिते महाविद्यालय कॅालेज कट्टा उपक्रम संपन्न

अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून 'कॉलेज कट्टा' या अभिनव उपक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.."
महाविदयालय विकास समितीचे अध्यक्ष सयाजीराजे मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यापैकी या वेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज, सहकार महर्षी आणि राजमाता आक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर व ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. शिरीष शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
 कॅालेज कट्टा यामध्ये उत्स्फूर्त असा  एकूण १७ विद्यार्थ्यांनी आपल्या ओथंबलेल्या भावना कविता, मनोगते आणि साहित्यातून व्यक्त करीत तरुणाईच्या आवाजात मराठी भाषेचा स्वाभिमान घुमविला. 
प्रा. सौ. पताळे मॅडम यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
संपूर्ण सादरीकरणाचे नेटके नियोजन आणि निवेदन डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वय समितीचे सदस्य डॅा निवृत्ती लोखंडे, प्रा विनायक माने, प्रा प्रसाद लोहार व सर्व सहकारी प्राध्यापक मित्रांनी प्रयत्न केले. 
आभार डॅा. जनार्दन परकाळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages