समाजकल्याण सभापतीपदी संस्कृती सातपुते बिनविरोध
पानीव (कटूसत्य वृत्त) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतीपदी संस्कृती राम सातपुते यांची बिनविरोध निवड झाली आहे. माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटातून त्यांनी विजय मिळवत ही जबाबदारी स्वीकारली.
संस्कृती सातपुते यांनी निवडणुकीत आमदार Uttamrao Jankar यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव करत आपली ताकद सिद्ध केली होती. त्या माजी आमदार Ram Satpute यांच्या पत्नी आहेत.
या निवडीमुळे माळशिरस तालुका तसेच दहिगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यात भाजपने चांगली कामगिरी करत दोन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती जागांवर विजय मिळवला होता.
संघर्षमय परिस्थितीतही तालुक्यात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात राम सातपुते यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तसेच मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास या निवडीमधून अधोरेखित झाल्याची चर्चा आहे.
या निवडीबद्दल पालकमंत्री Jaykumar Gore, प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी संस्कृती सातपुते यांचे अभिनंदन केले.
पदग्रहण सोहळ्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. राम सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, स्मिता पाटील, रश्मी बागल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment