अकलूज वीज वितरणकडून बॅकवर्ड सोसायटीत सक्तीची वसूली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 28, 2026

अकलूज वीज वितरणकडून बॅकवर्ड सोसायटीत सक्तीची वसूली

 अकलूज वीज वितरणकडून बॅकवर्ड सोसायटीत सक्तीची वसूली


अकलूज (कटूसत्य वृत्त):- मार्च एंडिंगची कारणे देत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अकलूज महावितरण कडून, बॅकवर्ड सोसायटी (डॉ.आंबेडकर नगर अकलूज) येथे पोलीस बंदोबस्ताचा आधार घेत सक्तीची वसुली केली गेली, यामुळे स्थानिक रहिवाशांकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे. 
   अकलूज महावितरणकडून वीज पुरवठा देयक, ग्राहकांना 23 मार्चला देण्यात आला.तर देयकाची अंतिम तारीख 1  एप्रिल अशी देण्यात आली आहे, असे असताना वीज वितरण ग्राहकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा नोटीस न देता, बॅकवर्ड  सोसायटी आंबेडकर नगर अकलूज येथे वीज वितरणचे कर्मचारी, पोलीस बंदोबस्तामध्ये येऊन, सक्तीची वसुली करू लागले. काही ग्राहकांचा मीटर काढण्यात आला तर काही ग्राहक कुटुंबप्रमुख बाहेर गावी असताना त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला तर काही ग्राहक यांच्या बरोबर महावितरणचे कर्मचारी बेशिस्तपणे वागले तर काही ग्राहकांना पंधरा मिनिटांचाही अवधी सुद्धा न देता, त्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले, त्यांचे वीज पुरवठा मीटर काढण्यात आला.
        मार्च एंडिंगच्या नावाखाली वीज वितरण कंपनीकडून, कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, सक्तीची वसुली करणे नियमात बसते का? असा प्रश्न बॅकवर्ड सोसायटीतील रहिवाशांना पडला आहे.
     कोणत्याही प्रकारची ग्राहकांना नोटीस न देता अथवा वीज पुरवठा अंतिम देयक  1 एप्रिल 2026 असताना, कशाच्या आधारे बॅकवर्ड सोसायटी आंबेडकर नगर अकलूज येथे सक्तीची वसूली करण्यात आली असाही प्रश्न बॅकवर्ड सोसायटीतील रहिवाशांना पडला आहे.या बद्दल काही ग्राहकांना विचारले असता ते म्हणाले की जशी त्यांनी सक्तीची वसुली केली आहे तसेच समाधानकारक विद्युत पुरवठाही  करणे गरजेचे आहे. कारण आंबेडकर नगर परिसरात सतत विद्युत पुरवठा खंडित होतो. जेव्हा जेव्हा कर्मचाऱ्यांना विचारले जाते,तेव्हा तेव्हा ते एकच कारण देतात लिंक गेली आहे. सतत लिंक कोणत्या कारणाने जाते हे विद्युत वितरण अधिकाऱ्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे असा सवाल केला जात आहे.तर बॅकवर्ड सोसायटी मध्ये वीज वितरणकडून झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल का? चौकशीअंती संबंधित अधिकारी कर्मचारी यांचेवरती कठोर कारवाई करण्यात येईल का? याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages