कन्हेरगावच्या कु. ज्ञानदा डोके हिचे एन.एम.एम.एस. परीक्षेत उज्ज्वल यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 28, 2026

कन्हेरगावच्या कु. ज्ञानदा डोके हिचे एन.एम.एम.एस. परीक्षेत उज्ज्वल यश

 कन्हेरगावच्या कु. ज्ञानदा डोके हिचे एन.एम.एम.एस. परीक्षेत उज्ज्वल यश




टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत कन्हेरगाव (ता. माढा) येथील कु. ज्ञानदा अतुल डोके हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षेत तिने १७९ पैकी १२७ गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.
एन.एम.एम.एस. (National Means-cum-Merit Scholarship) ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने घेतली जाते. या परीक्षेमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) व शैक्षणिक प्रगती चाचणी (SAT) या दोन घटकांचा समावेश असतो. या दोन्ही घटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ज्ञानदाने आपले स्थान निश्चित केले आहे.
कु. ज्ञानदा ही New English School, Tembhurni येथील विद्यार्थिनी असून ती अभ्यासात सातत्य, जिद्द आणि शिस्तबद्ध नियोजनासाठी ओळखली जाते. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच तिने अतिरिक्त सराव, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन यावर भर दिला. तिच्या या यशामागे विभागप्रमुख आर. आर. पवार, एस. बी. मोटे तसेच शिक्षिका जरीता चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे पर्यवेक्षक बाळासाहेब चव्हाण, मुख्याध्यापक एस. डी. रोकडे तसेच पालक संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब खोचरे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्ञानदाच्या या उल्लेखनीय यशामुळे कन्हेरगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्ञानदाच्या जिद्दी व परिश्रमांमुळे इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे. भविष्यातही ती अशीच यशाची शिखरे सर करील, असा विश्वास शिक्षक व पालकांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages