स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ बापूसाहेब आडसूळ यांची बिननिविरोध निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ बापूसाहेब आडसूळ यांची बिननिविरोध निवड

 स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ बापूसाहेब आडसूळ यांची बिननिविरोध निवड




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे, भावी शिक्षक आमदार आरोग्य दूत मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणारी  स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली या पतसंस्थेच्या चेअरमनपदी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष, पुणे बोर्ड सदस्य, सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई प्रा डॉ बापूसाहेब आडसुळ यांची सर्व संचालक यांच्या मीटिंगमध्ये बिनविरोध चेअरमनपदी निवड करण्यात आली तर व्हा चेअरमनपदी प्रदेश सचिव प्रा गंगाधर पडणूरे यांची निवड करण्यात आली प्रसंगी सर्व संचालक मंडळ व शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी चेअरमन व्हा चेअरमन यांचा सत्कार सर्व संचालक मंडळ आणि डी डी आर ऑफिसचे जुजगार साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा बरोबर राज्यामध्ये शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या निवडीबद्दल राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages