Hot Posts

6/recent/ticker-posts

सोनी नगर‎ येथे नूतन ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’ सुरू; हजारो‎ नागरिकांना दिलासा

 सोनी नगर‎ येथे नूतन ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’ सुरू; हजारो‎ नागरिकांना दिलासा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर‎ महानगरपालिका‎ प्रभाग‎ क्रमांक २२ मधील‎ नागरिकांसाठी‎ आरोग्याच्या‎ दृष्टीने‎ मोठी आणि दिलासादायक ठरला आहे.‎ सोनी‎ नगर‎ येथे‎ नूतन ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’‎ उभारण्यात आले असून परिसरातील हजारो‎ नागरिकांना‎ याचा थेट लाभ होणार‎ आहे. या केंद्रासाठी प्रभागातील‎ भाजपा‎ नगरसेवक किसन जाधव, दत्तात्रय‎ नडगिरी,‎ सौ. अंबिका‎ नागेश अण्णा‎ गायकवाड‎ व सौ. चैत्रालीताई‎ शिवराज‎ गायकवाड यांनी जिल्ह्याचे‎ पालकमंत्री जयकुमार‎ गोरे‎ आणि सोलापूर‎ शहर मध्य‎ विधानसभा‎ मतदारसंघाचे आमदार‎ देवेंद्र‎ कोठे यांच्याकडे‎ सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या‎ सकारात्मक भूमिकेमुळे आणि प्रशासनाच्या‎ सहकार्याने‎ हे केंद्र साकार‎ झाले. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन‎ ओंबासे, उपायुक्त‎ लोकरे साहेब‎ व आरोग्य‎ अधिकारी‎ राखी माने‎ यांच्या मार्गदर्शनाखाली‎ केंद्राची उभारणी‎ पूर्ण झाली. या केंद्रामुळे सोनी नगर‎ हडको, लहान‎ इरण्णा‎ वस्ती, मोठी‎ इरण्णा वस्ती, रेवणसिद्धेश्वर नगर‎ झोपडपट्टी,‎ आम्रपाली‎ चौक परिसरातील नागरिकांना आर्थिक‎ आणि‎ आरोग्यदृष्ट्या‎ मोठा फायदा‎ होणार‎ आहे. उद्घाटनानिमित्त आयोजित‎ आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून‎ नागरिकांची तपासणी करून‎ मोफत‎ औषधोपचार‎ देण्यात आले.‎ अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज‎ असलेले हे‎ केंद्र‎ कष्टकरी‎ कामगारांसाठी वरदान ठरणार‎ असल्याचे नगरसेवक‎ किसन‎ जाधव यांनी‎ सांगितले. तसेच या उपक्रमासाठी पालकमंत्री‎ गोरे आणि‎ आमदार कोठे‎ यांचे त्यांनी विशेष‎ आभार‎ मानले.‎ प्रभाग‎ २२‎ मध्ये आरोग्यसेवेचा हा‎ नवा अध्याय ठरून नागरिकांच्या जीवनमानात‎ सकारात्मक‎ बदल‎ घडवेल,‎ असा विश्वास व्यक्त केला जात‎ आहे. या आरोग्य शिबिराप्रसंगी‎ डॉ. म्हेत्रे, प्राजक्ता काकडे,‎ रुपेश गायकवाड,‎ संतोष‎ माने,‎ इस्माईल मनुरे,‎ मल्लिकार्जुन‎ बेनावत, अविनाश‎ गवळी, उमेश चलवादी,प्रीती गायकवाड‎ आदी‎ आरोग्य‎ केंद्रातील कर्मचारी‎ यांच्यासह नागेश ढेंगळे,‎ संतोष‎ गायकवाड,‎ हरीश‎ तेलगू, विकी‎ सगटे,‎ सिद्राम माडेकर, येलगुंडे‎ मावशी, वसंत पवार आदींची उपस्थिती‎ होती. या आरोग्य शिबिरास‎ परिसरातील‎ नागरिकांनी उस्फूर्त‎ प्रतिसाद‎ दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments