अन्नछत्र मंडळाचे धार्मिक क्षेत्रा बरोबरच श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात भर टाकणारे कार्य- राजेश पांडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

अन्नछत्र मंडळाचे धार्मिक क्षेत्रा बरोबरच श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात भर टाकणारे कार्य- राजेश पांडे

 अन्नछत्र मंडळाचे धार्मिक क्षेत्रा बरोबरच श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात भर टाकणारे कार्य-  राजेश पांडे




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे धार्मिक क्षेत्रा बरोबरच श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात भर टाकणारे कार्य सतत होत असल्याचे मनोगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे पुणे यांनी व्यक्त केले.

पुणे येथील नारायण पेठ मोदी गणपती जवळील भरत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांच्या संपर्क कार्यालयात राजेश पांडे व त्यांच्या धर्मपत्नी सौ पांडे यांचा सहपरिवार सत्कार संदीप खर्डीकर यांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांची कोरीव प्रतिमा, पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्काराचे उत्तर देताना राजेश पांडे हे बोलत होते.

या सत्कार कार्यक्रमास पुणे येथील भरत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष-बाळासाहेब दाभेकर,  सिने अभिनेते व गायक संदिप पाटील, अननछत्र मंडळाचे विश्वस्त व पालखी संयोजक संतोष  भोसले,पुण्याचे माजी नगरसेवक राजेश यनपुरे, शिरीष मावळे, अजित दरेकर,प्रमोद घाडगे,भाऊ भितांडे,मयूर कडून,निलेश, मनोज पाटील, अनिल यनपुरे,  ,दिलीप भाऊ सिध्दे ,शिवराज स्वामी, महांतेश स्वामी, संतोष माने ,सरफराज शेख,यांच्यासह भरत मित्र मंडळाचे असंख्य कायॅकतेॅ उपस्थित होते.

चौकट:-
सहकार्य असावेत-
राजेश पांडे यांनी आर.एस.एस. चे स्वयंसेवक ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपाचे निष्टावंत आहेत. त्या नंतर त्यांच्यावर आता प्रदेश भाजपा ची जबाबदारी पडली आहे. ते सार्थपणे सांभाळतील, राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र अक्कलकोट चे तरुण, तडफदार विकासाभिमुख नेतृत्व आमदार सचिन कल्याणशेट्टी व त्यांचे बंधू श्री स्वामी समर्थ नगरीचे प्रथम नागरिक, रॉयल नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी हे शहराच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या विकास कार्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून राजेश पांडे हे खंबीर साथ देतील. केंद्रीय रस्ते विकास, परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी हे श्री क्षेत्र अक्कलकोटच्या रस्ते बाधणी करिता मोलाचे व महत्वपूर्ण योगदान देत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे श्रध्येय आहे.

जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले
संस्थापक अध्यक्ष
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages