पहाट’ उपक्रमांतर्गत जात प्रमाणपत्र वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

पहाट’ उपक्रमांतर्गत जात प्रमाणपत्र वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 पहाट’ उपक्रमांतर्गत जात प्रमाणपत्र वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डूवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘पहाट’ उपक्रमांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पारधी समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली.
तसेच भेंड येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या हस्ते विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. ‘पहाट’ उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, पर्यावरण संरक्षण व शासकीय योजनांची जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
         कार्यक्रमास पोलीस अधीक्षक मा.अतुल कुलकर्णी,सहापोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही एस मॅडम तसेच अतुल मोहिते, पोलीस निरीक्षक, कुर्डूवाडी पोलीस ठाणे व नायब तहसीलदार, ठोंबरे व भडकवाड ,माढा तहसील कार्यालय, आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी ,सरतापे तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक शिरोळे ,स्थानिक ग्रामस्थ, पोलीस  कर्मचारी मोठ्या संख्ये उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages