नातेपुते नगर पंचायतीकडून वसूली मोहीम,थकीत रकमेवर दोन टक्के आकारणी- मुख्याधिकारी शिंगाडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

नातेपुते नगर पंचायतीकडून वसूली मोहीम,थकीत रकमेवर दोन टक्के आकारणी- मुख्याधिकारी शिंगाडे

 नातेपुते नगर पंचायतीकडून वसूली मोहीम,थकीत रकमेवर दोन टक्के आकारणी- मुख्याधिकारी शिंगाडे




 

नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते नगर पंचायतीच्या ह‌द्दीतील मालमत्ता धारकांकडून आर्थिक वर्ष २०२५-२६ चा मालमता कर, गाळे भाडे तसेच पाणीपट्टीच्या वसुलीची विशेष मोहीम राबवण्यात येत आसुन थकीत मागणीच्या रकमेवर दरमहा दोन टक्के रकमेची आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा व औ‌द्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार मालमता धारकांनी थकीत व चालू मालमत्ता कर, गाळे भाडे व पाणीपट्टी यांची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे. जे मालमत्ताधारक विहित मुदतीत या रकमांचा भरणा करणार नाहीत अशांच्या थकीत मागणीच्या रकमेवर दरमहा दोन टक्के व्याजाचे आकारणी करण्यात येणार आहे.व्याज आकारणी टाळण्यासाठी मालमत्ता धारकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कर, गाळा भाडे पाणीपट्टी नगर पंचायतीच्या कार्यालयात तत्काळ भरावेत अन्यथा मालमत्ता सील करणे, गाळा सील करून नगर पंचायतीच्या ताब्यात घेणे, पाणीपुरवठा नळ कनेक्शन बंद करणे, मालमत्ता धारकांची नावे शहरातील प्रमुख चौकाचौकात प्रसिद्ध करणे यांसारखी कारवाई करण्याचे नियोजन नातेपुते नगरपंचायतीने केले आहे. त्यानुसार १ मार्च २०२६ पासून थकबाकी दारांचे नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई पाणीपट्टी विभागाकडून करण्यात येणार आहे. तरी सर्व मालमत्ता धारकांनी ही कठोर कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू रकमांचा तत्काळ नगरपंचायतीच्या  कार्यालयात भरणा करून नगरपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन नातेपुते नगर पंचायतीच्या वतीने नातेपुते शहरातील नागरिकांना नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी विकास शिंगाडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages