रानमसले येथे ग्रामस्वच्छता अभियान व गांडुळखत निर्मिती तंत्रज्ञान मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

रानमसले येथे ग्रामस्वच्छता अभियान व गांडुळखत निर्मिती तंत्रज्ञान मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

 रानमसले येथे ग्रामस्वच्छता अभियान व गांडुळखत निर्मिती तंत्रज्ञान मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराअंतर्गत दुसऱ्या दिवशी मौजे रानमसले ता. उत्तर सोलापूर येथे ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. रानमसले गावचे सरपंच मनोहर क्षिरसागर, उपसरपंच रमेश सुतार, सौ. प्रतिभा पाटील मुख्याध्यापिका जि.प. प्राथमिक शाळा, रानमसले, लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी प्रा. आशिष सरकाळे, प्रा. सायली बडेकर, सर्व स्वयंसेवक तसेच रानमसले ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमसले येथे व गावातील मुख्य चौकात परिसर स्वच्छ  करून करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत रासेयो स्वयंसेवकांनी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रानमसले गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, ग्रामपंचायत परिसर, गावातील ब्रम्हगायत्री मंदिर परिसर तसेच गावातील मुख्य ठिकाणांची स्वच्छता केली. याप्रसंगी स्वयंसेवकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने रानमसले गावातील विविध चोकात पोस्टर्सच्या व घोषवाक्यांच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता व प्लॅस्टिक मुक्त परिसर अभियान राबविले. सायंकाळच्या सत्रात गांडुळखत निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास व्याख्याते व मार्गदर्शक म्हणून प्रा. अनिकेत घोडके (लोकमंगल कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय) हे लाभले होते. त्यांनी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थी यांना गांडुळखत निर्मिती करण्याची शास्त्रोक्त पद्धत, त्यासाठी आवश्यक सामग्री, गांडुळखत निर्मिती करताना बेड कसे तयार करावे व कोणती काळजी घ्यावी, तसेच गांडुळखताचे सेंद्रिय शेतीतील महत्त्व व त्यामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी विविध मूलभूत घटक, एका बेडपासून तयार होणारे गांडुळखत उत्पादन व खर्च यांविषयी सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. याप्रसंगी रानमसले गावातील ग्रामस्थ, शाळेतील सर्व विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन, रानमसले गावचे सरपंच मनोहर क्षीरसागर व उपसरपंच रमेश सुतार व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages