श्री विठ्ठल शिक्षण व ज्ञानपीठ संस्थेचे एनएमएमएस परीक्षेत उज्ज्वल यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

श्री विठ्ठल शिक्षण व ज्ञानपीठ संस्थेचे एनएमएमएस परीक्षेत उज्ज्वल यश

 श्री विठ्ठल शिक्षण व ज्ञानपीठ संस्थेचे एनएमएमएस परीक्षेत उज्ज्वल यश




माढा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती अर्थात एनएमएमएस या इयत्ता 8 वी करिता घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ व श्री विठ्ठल ज्ञानपीठ या दोन्ही संस्थांच्या अनुक्रमे उपळाई खुर्द व आनंदनगर-मानेगाव शाखांमधील एकूण 16 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादित केले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

उपळाई खुर्दच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नरेंद्र श्रीधर गोरे-142 गुण,वैष्णवी तानाजी राऊत-113 गुण,प्रतीक्षा अजिनाथ राऊत-101गुण, श्रावणी धनाजी हराळे-100 गुण,सायली दिनेश केदार -87 गुण,सार्थक बालाजी यादव -80 गुण,संकेत सोमनाथ जाधव-78 गुण,सुप्रिया उद्धव बंडगर-76 गुण,गौरी भाऊ हराळे-76 गुण,समर्थ आप्पासाहेब बोराडे-76 गुण व तेजू दत्तात्रय जाधव-73 गुण यांचा समावेश आहे.

आनंदनगर-मानेगाव येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये श्रुती लक्ष्मण घोगरे-89 गुण,स्नेहा अण्णासाहेब खोत-80 गुण,अस्मिता विनोद लटके-79 गुण,आरती योगेश पवार-75 गुण,हर्षद हनुमंत खोत-74 गुण यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक हनुमंत खापरे, तुकाराम कापसे,लहू लोंढे,छाया राऊत, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,महेश नागटिळक,प्रविण लटके, तनुजा तांबोळी,त्रिशला साळुंखे,स्वाती पाटोळे व गजानन साठे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,चेअरमन विक्रमसिंह शिंदे, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे,सरपंच संदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी विकास यादव,केंद्रप्रमुख रमाकांत पवार,केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages