पाणी द्या अन्यथा कर भरणार नाही! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

पाणी द्या अन्यथा कर भरणार नाही!

 पाणी द्या अन्यथा कर भरणार नाही!




प्रभाग क्र. 20 नागरिकांचा महापालिकेला इशारा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग 20 मधील आनंदनगर भाग 1 येथे गेल्या दीड वर्षापासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. सध्या ऐन रमजान सणाच्या कालावधीत सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सुरळीत पाणीपुरवठा करा, अन्यथा महापालिकेचा कर भरणार नाही,असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
सध्या रमजानचा महिना सुरू झाला आहे. अशातच प्रभाग क्रमांक 20 मधील आनंदनगर भाग 1 येथील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.  महापालिकेकडून आमच्याकडून नियमित टॅक्स घेण्यात येत आहे, परंतु महापालिकेकडून सोयीसुविधा मिळत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे.
गेल्या दीड वर्षापासून आनंदनगर येथील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नाहक त्रास सोसावा लागत आहे. या संदर्भात संबंधित नागरिकांनी वारंवार महानगरपालिका व तसेच झोन क्रमांक पाच येथील संबंधित अधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले, तरीदेखील अद्यापही त्याची दखल कोणीच घेत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास आम्ही महापालिकेचा कर भरणार नाही, असा इशारा हिरोली गुलाम मोसिन, बेग अब्दुल सलाम अजीज, अब्दुलसाब करनूल, बेग् नीलोफर अब्दुल सलाम, सुदीप संगप्पा माशाळकर, दखनी अब्दुल रशीद, दस्तगीरसाब इलियास शिलेदार आदींसह या प्रभागातील नागरिकांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages