मध्य रेल्वेची दमदार आर्थिक कामगिरी; जानेवारी २०२६ पर्यंत १४,४४१ कोटींचे उत्पन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

मध्य रेल्वेची दमदार आर्थिक कामगिरी; जानेवारी २०२६ पर्यंत १४,४४१ कोटींचे उत्पन्न

 मध्य रेल्वेची दमदार आर्थिक कामगिरी; जानेवारी २०२६ पर्यंत १४,४४१ कोटींचे उत्पन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मध्य रेल्वे ने आर्थिक वर्ष २०२५-२६ (जानेवारी २०२६ पर्यंत) एकूण १४,४४१.२३ कोटी रुपयांचे प्रवासी व वाणिज्यिक उत्पन्न नोंदवले आहे. प्रवासी उत्पन्नातून ६,५६१.३८ कोटी रुपये, मालवाहतुकीतून ६,७४१.२९ कोटी रुपये, इतर कोचिंगमधून ६४०.८० कोटी रुपये आणि विविध उत्पन्नातून ४९७.७६ कोटी रुपये मिळाले आहेत.
इतर कोचिंग उत्पन्नात नॉन-फेअर उपक्रमांतून १०८.५८ कोटी रुपये आणि पार्सल वाहतुकीतून २०९.९७ कोटी रुपयांचा समावेश आहे.
जानेवारी २०२६ मधील कामगिरी
जानेवारी २०२६ महिन्यात एकूण १,५७९.८० कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवण्यात आले. यात प्रवासी उत्पन्न ६८०.३० कोटी, मालवाहतूक ७८४.०७ कोटी, इतर कोचिंग ६३.०९ कोटी आणि विविध उत्पन्न ५१.५३ कोटी रुपये आहे. नॉन-फेअर उपक्रमांतून ११.७१ कोटी आणि पार्सल वाहतुकीतून २२.०३ कोटी रुपये मिळाले.
ई-लिलावाद्वारे १४ कंत्राटे देण्यात येऊन २४४.५१ लाख रुपयांचे वार्षिक परवाना शुल्क निश्चित करण्यात आले. मुंबई विभागाने जाहिराती व स्टॉल्ससाठी १४६.१३ लाख, भुसावळ विभागाने विविध जाहिराती व प्रतीक्षालयांसाठी ८४.१७ लाख, तर नागपूर विभागाने विविध कंत्राटांद्वारे १४.२१ लाख रुपयांचे उत्पन्न निश्चित केले.
याशिवाय, जानेवारी २०२६ मध्ये १७१ वेळापत्रकबद्ध, भाडेपट्टा व इंडेंट गाड्या चालवण्यात आल्या. यात भिवंडी रोड–सांकराईल गुड्स यार्ड, देवळाली–दानापूर (शेतकरी समृद्धी एक्सप्रेस) तसेच नागपूर विभागातील रेनिगुंटा–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसला जोडलेले दूध टँकर यांसारख्या सेवांचा समावेश आहे.
मध्य रेल्वे प्रवासी व मालवाहतूक सेवा अधिक कार्यक्षम करत महसूल वाढीवर भर देत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages