Hot Posts

6/recent/ticker-posts

"छत्रपती शिवाजी महाराज नाचून नाही तर वाचून समजून घेतले पाहिजेत"- ह.भ.प. अभिनंदन महाराज

 "छत्रपती शिवाजी महाराज नाचून नाही तर वाचून समजून घेतले पाहिजेत"- ह.भ.प. अभिनंदन महाराज




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंकृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराअंतर्गत मौजे रानमसले तालुका उत्तर सोलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मुख्य व्यासपीठावर शिवचरित्रावर आधारित ह.भ.प अभिनंदन महाराज यांचे मार्गदर्शपर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प अभिनंदन महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती संपन्न झाली. याप्रसंगी राजाराम गरड, श्रीकांत गरड, नंदकुमार गरड
रानमसले गावातील सर्व शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यानंतर राजाराम गरड यांच्या हस्ते ह.भ.प अभिनंदन महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ह.भ.प अभिनंदन महाराज हे संत साहित्याचे विशेष अभ्यासक असून ज्ञानेश्वरी चिंतन प्रवक्ते आहेत. ते कीर्तनरुपी प्रवचन आणि समाजप्रबोधन करतात. विशेष म्हणजे ते शिवचरित्रकार म्हणूनही ओळखले जातात आणि त्यांनी वारकरी संप्रदायाचा वसा टिकवून ठेवला आहे.
ह.भ.प अभिनंदन महाराज यांनी शिवरायांच्या चरित्रावर व जीवनशैलीवर आधारित अतिशय आकर्षक व समाजप्रबोधनपर प्रवचनरुपी मार्गदर्शन केले. ह.भ.प अभिनंदन महाराज यांच्या मते कृष्णाची नीती, रामाची मर्यादा व नरसिंहाचे सामर्थ्य या तिन्ही शक्तिशाली अवतारांचा संगम होऊन तयार झालेले युगपुरुष अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचे व्यक्तिमत्व अगदी सोप्या व सुबक शब्दात त्यांनी श्रोत्यांच्या डोळ्यासमोर प्रस्थापित केले.
तुम्हाला स्वतः नदी स्वच्छ करण्याची गरज नाही पण ती गढूळ तरी करू नये, रस्ते स्वच्छ करायची गरज नाही पण किमान कचरा तरी पसरवू नये, झाडे लावण्याची गरज नाही पण लावलेली झाडे तरी तोडू नये असे त्यांचे मत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हे सर्वांनी नाचून नाही तर वाचून समजून घेणे आवश्यक आहे. शिवरायांच्या जयंती निमित्त विविध समाजप्रबोधनपर कार्य करणे, म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवरायांचे चरित्र समजणे आहे असे ते म्हणतात. या कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने करण्यात आली.
हा मंगलमय प्रवचनरुपी मार्गदर्शनपर सोहळा सर्व प्रमुख अतिथी, कार्यक्रमाचे आयोजक, शिवप्रतिठान मंडळ रानमसले, सर्व रानमसले ग्रामस्थ व रासेयो स्वयंसेवक या सर्वांच्या सहकार्याने सुरळीत पार पडला. यासाठी गावचे सरपंच मनोहर क्षीरसागर, उपसरपंच रमेश सुतार, सर्व रानमसले ग्रामपंचायत सदस्य, लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सरकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता व त्यास सर्व रानमसले ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Reactions

Post a Comment

0 Comments