नवी मुंबईत ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी सोलापूर प्रशासनाची आढावा बैठक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

नवी मुंबईत ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी सोलापूर प्रशासनाची आढावा बैठक

 नवी मुंबईत ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी सोलापूर प्रशासनाची आढावा बैठक




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नवी मुंबई येथे दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी होणाऱ्या हिंद दी चादर – श्री गुरू तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली.  

ही बैठक आ. धर्मगुरू बाबुसिंग महाराज (विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य तथा अशासकीय सदस्य, राज्यस्तरीय समन्वय समिती) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  

बैठकीत बोलताना आ. धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांनी सांगितले की, श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे कार्य महान असून त्यांनी समाजातील सर्व जाती-धर्माला समानतेची शिकवण दिली आहे. या कार्यक्रमासाठी समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मुंबईला जाणाऱ्या भाविकांसाठी शासनाने रेल्वेची सोय करावी, अशी मागणीही त्यांनी केली.  

यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कासेकर यांनी शासनाकडून योग्य नियोजन करून कार्यक्रमाला जाणाऱ्या लोकांसाठी समन्वयक नेमून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.  

बैठकीस उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कासेकर, बंजारा समाजाचे आ. धर्मगुरू बाबुसिंग महाराज, अशासकीय सदस्य आशोक चव्हाण, जेष्ठ मार्गदर्शक सदाशिव चव्हाण, वसंतराव नाईक, बंडू महाराज (दापकेकर), तसेच क्षेत्रीय आयोजन समिती व संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना अशासकीय सदस्य श्रीमंतराजे चव्हाण, मोतीराम राठोड, युवराज राठोड, विजय राठोड, नाम पवार, सोमनाथ राठोड इत्यादी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages