प्रभागात आता केवळ आश्वासने नाही तर कृतीतून विकास दिसेल- किसन जाधव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका नागरी दलितेतर योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक २२ बुवा गल्ली मध्ये तब्बल ₹१४ लाख १८ हजार ४९२ रुपयांच्या खर्चातून रस्ता कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या कामाच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. नुकतेच निवडणुकीच्या प्रचारार्थ सोलापूर हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणामध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी प्रभाग २२ मधील विकासासाठी महत्त्वाची घोषणा केली होती, आज त्या शब्दाची पूर्तता करत त्यांनी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. जोपर्यंत सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मी डोक्यावर फेटा बांधणार नाही, अशी भूमिका घेणारे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे हे खऱ्या अर्थाने जनतेचे सक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व असल्याची भावना नगरसेवक किसन जाधव यांनी व्यक्त केली. माजी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सहकार्याने आणि विद्यमान नगरसेवक दत्तात्रय नडगिरी, चैत्रालीताई शिवराज गायकवाड व अंबिकाताई नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून हा विकासप्रकल्प साकार झाला. प्रभाग २२ चे नगरसेवक किसन जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, देवेंद्र कोठे यांचे कार्य आणि विकासात्मक धोरणे प्रभागासाठी मोलाची ठरत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे प्रभाग २२ चा विकास आता कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार युवा आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार्याने प्रभाग २२ च्या विकासाचा वेग अधिक वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रभाग २२ मध्ये आता केवळ आश्वासने नाहीत, तर कृतीतून विकास दिसत आहे. हा शुभारंभ म्हणजे आगामी काळातील सर्वांगीण प्रगतीचा नांदीघोष ठरला आहे. या रस्ता काम शुभारंभ प्रसंगी नारायण मामा कांबळे, दत्ता मामा जाधव, शिवाजी कांबळे, सुरेश मामा टेळे, अजित लकडे, बाळासाहेब वाघमारे, शिवाजी इरकर, पवन खांडेकर, महालिंग जाधव, प्रकाश केकडे, अमोल भाऊ जगताप, देविदास जगताप मामा महाराज, कुमा मामी लकडे, भागाताई पाटणकर, शारदाताई जगताप, मोरे मावशी, शुभांगी ताई लकडे, गंगू मावशी जरग, संगीता ताई सरवदे,गंगोताई कांबळे, वनिता ताई पाटील, पूजाताई पाटणकर, कल्पनाताई चोरगे, इरकर ताई, खंडागळे ताई, अनिताताई जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती

0 Comments