एस.व्ही.सी.एस. प्रशालेचे एन.एम.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 26, 2026

एस.व्ही.सी.एस. प्रशालेचे एन.एम.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश

 एस.व्ही.सी.एस. प्रशालेचे एन.एम.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत एस. व्ही. सी. एस. हायस्कूल एमआयडीसी येथील प्रशालेने घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. प्रशालेतील चैताली सदाफुले, श्रेया नरोटे, श्रीविद्या गोसकी, योगेश सुप्पल, गौरव समाणे, अपर्णा चौरे, प्रणव बोडके, प्रसाद क्षिरसागर, त्रिशा कौंची, सृष्टी बाबानगरे, अनुष्का पाटील व आविष्कार सोनवणे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना प्रवीण नवले, रामेश्वर चोबे, रोहिणी कल्याणशेट्टी, शैलजा भुसारे व रेवणसिद्ध बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे, उपमुख्याध्यापक धनंजय नकाते व पर्यवेक्षक केदार पटणे यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages