लक्ष्मी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना मंडईतच बसण्याचे आयुक्तांचे सक्त आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 26, 2026

लक्ष्मी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना मंडईतच बसण्याचे आयुक्तांचे सक्त आदेश

 लक्ष्मी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना मंडईतच बसण्याचे आयुक्तांचे सक्त आदेश




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील वाहतुकीची कोंडी होतं असून आणि बाजारपेठेत शिस्त आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये येत लक्ष्मी मार्केट (मंडई) परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांमुळे होणारा वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी सर्व विक्रेत्यांनी पालिकेने नेमून दिलेल्या मंडई जागेवरच भाजी विक्री करावी, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला.आयुक्तांनी मंडईत प्रत्यक्ष जाऊन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी विक्रेत्यांनी प्रामुख्याने स्वच्छता, बसण्याची व्यवस्था आणि मूलभूत सुविधांबाबत आपल्या मागण्या मांडल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना  त्वरित सुविधा पुरवा मंडईच्या आत भाजी विक्रेत्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन तिथे तातडीने सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.स्वच्छतेवर भर मंडई परिसरात नियमित स्वच्छता राहील याची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी.यावेळी पाहणी दौऱ्याप्रसंगी मंडई विभाग प्रमुख तपन डंके, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages