एकाच रात्रीत दोन भीषण अपघात; म्हैसगावात दोन दुचाकीस्वार ठार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

एकाच रात्रीत दोन भीषण अपघात; म्हैसगावात दोन दुचाकीस्वार ठार

 एकाच रात्रीत दोन भीषण अपघात; म्हैसगावात दोन दुचाकीस्वार ठार

कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावरील घटना : अॅम्ब्युलन्स चालकांनी दिली माहिती





कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- कुईवाडी बार्शी रस्त्यावर म्हैसगाव गावशिवारात एकाच रात्रीत वेगवेगळ्या अपघातांत दोन मोटारसायकलस्वार ठार झाले. या दोन अनिल भारती सागर गायकवाड घटना म्हैसगाव (ता. माढा) शिवारात सोमवारी, २३ फेब्रुवारी रोजी रात्री घडल्या आहेत. या दोन्ही अपघातांची पोलिसांत
नोंद झाली आहे. अनिल भागवत भारती (वय ३७, रा. महादेववाडी, ता. माढा) व सागर सयाजी
गायकवाड (वय ३५, रा. रिधोरे, ता. माढा) असे दोन वेगवेगळ्या अपघातांतील दोन मृतांची नावे आहेत.
फिर्यादी लक्ष्मण गजेंद्र भारती (रा. महादेववाडी, ता. माढा) यांना रात्री आठ वाजता अॅम्ब्युलन्स चालकाने फोन करून त्यांचा चुलत भाऊ अनिल भागवत भारती याचा म्हैसगाव शिवारात अपघात झाल्याची माहिती दिली. त्याला ग्रामीण रुग्णालय, कुर्डुवाडी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दुसऱ्या अपघातात २४ फेब्रुवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास पोलिस गस्त घालत असताना म्हैसगाव शिवारात गजानन हॉटेलसमोर सागर सयाजी गायकवाड (रा. रिधोरे, ता. माढा) हा मोटासायकलवरून (एमएच ४५ / के. ४३१२) कुर्डुवाडीहून रिधोरेकडे येत असताना त्याचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तो बेशुद्धावस्थेत होता. मोटारसायकल रस्त्याच्या कडेला पडलेली होती. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी येथे दाखल केल्यानंतर तो उपचारापूर्वीच मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी पहाटे तीन वाजता मृत सागर सयाजी गायकवाड (रा. रिधोरे याच्या घरी जाऊन आई- वडिलांना अपघाताची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages