मराठी भाषा: गौरवशाली व वैभव शाली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

मराठी भाषा: गौरवशाली व वैभव शाली

 मराठी भाषा: गौरवशाली व वैभव शाली





 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठी भाषेचा वारसा समृद्ध असा असून मराठी भाषेचा  अभिमान सर्वांनी सदैव बाळगावा. घरी व कामाच्या ठिकाणी मराठी भाषेचा आवर्जून वापर करावा. मराठी भाषा ही केवळ भाषा नसून मराठी माणसांमध्ये आत्मीयता ,नातेसंबंध व जाणीवता दृढ करणारी बोली असून मराठी भाषा ही गौरवशाली व वैभवशाली असल्याचे प्रतिपादन दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांनी केले.

   जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूरच्या वतीने  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त थोर साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित मराठी भाषेतील ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशांत माने उद्घाटक म्हणून बोलत होते . 

  जिल्हा ग्रंथालय अधिकारी  सुनील हुसे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व व पार्श्वभूमी सांगून सर्वांनी यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेऊन हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषा अधिकारी प्रमोद पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे यांनी केले.     

  कार्यक्रमास प्रदीप गाडे, यल्लाप्पा घोडके, तालुका ग्रंथपाल धोंडीराम जेऊरकर,नरसिंह मिसालोलू,कुमार जम्मा,अर्जुन जाधव तसेच शहरातील ग्रंथालय पदाधिकारी कार्यकर्ते  व वाचक कार्यक्रमास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages