करियर साठी इंग्रजी भाषा वापरू शकता परंतु मातृभाषेचा विसर पडता कामा नये : संदीप पानसरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

करियर साठी इंग्रजी भाषा वापरू शकता परंतु मातृभाषेचा विसर पडता कामा नये : संदीप पानसरे

 करियर साठी इंग्रजी भाषा वापरू शकता परंतु मातृभाषेचा विसर पडता कामा नये : संदीप पानसरे




नातेपुते (कटूसत्य वृत्त):-

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी मराठी भाषा मोठी केली लहानपणापासून आई जी भाषा बोलत असते ती आपण ऐकतो तीच आपली मातृभाषा मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी करियर साठी वापरू शकता परंतु मातृभाषेचा विसर कधीही पडता कामा नये असे मत एस.एन.डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे मुख्याध्यापक संदीप पानसरे यांनी व्यक्त केले.
       ते एस.एन.डी.इंटरनॅशल सीबीएसई स्कूल मध्ये
मराठी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी उपमुख्याध्यापक शकूर पटेल प्राथमिक विभाग प्रमुख नीलम डोंबाळे पीआरओ मनोज राऊत भैय्यासाहेब भागवत उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच विविध वेशभूषा धारण करून महाराष्ट्राची लोकधारा गीतांचे सादरीकरण केले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेघा सुतार, सारिका बंदुके, कस्तुरादेवी कोरे, शितल बिचुकले, वर्षा लांडगे, सुनंदिनी रणसिंग यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शकूर पटेल यांनी केले असून सूत्रसंचालन व आभार भैय्यासाहेब भागवत यांनी माणले. कार्यक्रमासाठी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages