पीएम-उषा योजनेतून सोलापूर विद्यापीठात नव्या इमारतींचे भूमिपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

पीएम-उषा योजनेतून सोलापूर विद्यापीठात नव्या इमारतींचे भूमिपूजन

 पीएम-उषा योजनेतून सोलापूर विद्यापीठात नव्या इमारतींचे भूमिपूजन


  

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे पीएम-उषा योजनेअंतर्गत करिअर मार्गदर्शन केंद्र व वाणिज्य-व्यवस्थापन संकुलाच्या नव्या इमारतींचे भूमिपूजन मंगळवारी उत्साहात पार पडले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार, कौशल्याधारित आणि प्रेरणादायी शिक्षणाचे वातावरण मिळेल, असा विश्वास सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

अत्याधुनिक करिअर मार्गदर्शन केंद्राचे भूमिपूजन कुलकर्णी यांच्या हस्ते, तर वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाच्या इमारतीचे भूमिपूजन उद्योगपती यतीन शहा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते.
कुलकर्णी म्हणाले, आधुनिक शैक्षणिक इमारती, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन सुविधा, कौशल्यविकास प्रशिक्षण केंद्रे व क्रीडा सुविधा यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल. उभारल्या जाणाऱ्या या पायाभूत सुविधांचा दीर्घकालीन लाभ हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.
पीएम-उषा विभागाचे उपसंचालक दत्तात्रय लोंढे यांनी सांगितले की, राज्यातील केवळ चार विद्यापीठांना प्रत्येकी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यात सोलापूर विद्यापीठाचा समावेश आहे. या निधीतून शैक्षणिक व संशोधन पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत.
कुलगुरू डॉ. महानवर यांनी शासन, उद्योग व समाजाच्या सहकार्याने विद्यापीठाची प्रगती होत असल्याचे नमूद केले. करिअर मार्गदर्शन केंद्रामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व रोजगार संधींबाबत योग्य दिशा मिळेल, तर नव्या संकुलामुळे आधुनिक अध्यापनाला बळ मिळेल, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. लक्ष्मीकांत दामा, राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. अतुल लकडे, अॅड. मल्लिनाथ शहाबादे, डॉ. वीरभद्र दंडे, माधव देशपांडे, अजित संगवे, डॉ. जैनुद्दीन मुल्ला, डॉ. महादेव खराडे, डॉ. श्रीकांत अंधारे, गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पीएम-उषा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages