चंचला खरात यांच्या 'चित्रस्पर्श' या चित्र प्रदर्शनाचे आज सायंकाळी उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 28, 2026

चंचला खरात यांच्या 'चित्रस्पर्श' या चित्र प्रदर्शनाचे आज सायंकाळी उद्घाटन

 चंचला खरात यांच्या 'चित्रस्पर्श' या चित्र प्रदर्शनाचे आज सायंकाळी उद्घाटन






सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  येथील प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांच्या मातोश्री चंचला आनंद खरात यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अनोखी चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांचे 'चित्रस्पर्श' हे अनोखे चित्र प्रदर्शन शनिवार 28 फेब्रुवारी रोजी डफरीन चौकातील पू.ना. गाडगीळ अँड सन्सच्या झपुर्झा आर्ट  गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

चित्रकार सचिन खरात यांना आई चंचला खरात यांच्यामुळेच चित्रकलेची गोडी लागली. माझ्या आईमुळेच मी कलाप्रेमी बनलो आणि जगभरात माझी चित्रे पोहोच करण्यात यशस्वी ठरलो असे सचिन खरात यांनी वारंवार सांगितले आहे. चंचला खरात यांनाही त्यांच्या शालेय जीवनापासून चित्रकलेची आवड होती. 

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विना पवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक

भाग्यश्री जाधव, कलाप्रेमी उद्योजक किशोर चंडक, आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छंचुरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या प्रदर्शनात विक्री होणाऱ्या चित्रातील 25% रक्कम आस्था रोटी बँकेला देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कलाप्रेमींनी चित्र प्रदर्शनाला भेट द्यावे असे आवाहन सचिन खरात यांनी केले आहे. 28 फेब्रुवारी 7 मार्च या कालावधीत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages